जळगाव जि.प. समोर शिक्षकांचे धरणे आंदोलन
By Admin | Published: July 16, 2017 12:24 PM2017-07-16T12:24:45+5:302017-07-16T12:24:45+5:30
डी.एस.सरोदे यांचे निलंबन ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीने मागे घ्यावे
ऑ लाईन लोकमतजळगाव, दि. 16 - आर.आर.विद्यालय मुख्याध्यापक डी.एस.सरोदे यांचे निलंबन ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीने मागे घ्यावे या प्रमुख मागणीसाठी आर.आर.विद्यालयातील शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर शनिवारी धरणे आंदोलन केले. यावेळी शिक्षकांच्यावतीने उपमुख्याध्यापिका व्ही.के.काबरा, एन.आर.कुमावत, पी.एस.वानखेडे, पी.एस.याज्ञिक, बी.आर.बसेर, एस.एम.भोसले यांनी शिक्षणाधिका:यांना निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, मुख्याध्यापक सरोदे यांचे निलंबन त्वरित मागे घ्यावे, चौकशी अहवालावर लवकर कार्यवाही करून प्रशासक नियुक्त करावा व संस्थाध्यक्षांसह व्यवस्थापन मंडळाचा शालेय प्रशासकीय कामात हस्तक्षेप रोखावा. साखळी पध्दतीने केले आंदोलनविद्याथ्र्याचा शालेय कामकाजावर आंदोलनाचा परिणाम होऊ नये म्हणून शिक्षकांकडून साखळी पध्दतीने आंदोलन करण्यात आले. यामध्ये दुपार सत्राच्या शिक्षकांनी सकाळी तर सकाळ सत्रातील शिक्षकांनी दुपारी आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनात शिक्षकांसह अनेक माजी विद्यार्थीदेखील उपस्थित होते. सेवाज्येष्ठतेनुसार प्रभारी मुख्याध्यापक नेमणारआऱआऱशाळेच्या संस्थाध्यक्षांनी तत्कालीन मुख्याध्यापक डी़एस़सरोदे यांच्या निलंबनानंतर मुख्याध्यापक म्हणून एका शिक्षकाची नियुक्ती केली आह़े ती नियमबाह्य आह़े या शाळेच्या मुख्याध्यापकपदी तेथील शिक्षकांमधील सेवाज्येष्ठतेनुसार एका शिक्षकाची प्रभारी मुख्याध्यापक म्हणून निवड केली जाईल, असे आश्वासन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी दिले. निवेदन देतेवळी शिक्षक संघटना पदाधिकारी तसेच शिक्षकांना दिले आह़े