जळगाव जि.प.तर्फे पाणीपुरवठय़ाच्या जुन्या योजना पूर्ण करण्यावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:44 PM2017-09-16T12:44:32+5:302017-09-16T12:44:54+5:30
जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील : तालुका स्तरावर होणार आढावा
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 16 - भविष्यात पाणी टंचाई जाणवू नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली असून जुन्या योजना पूर्ण करणा:यावर भर देण्यात येत असल्याचे जि.प. अध्यक्षा उज्जवला पाटील यांनी सांगितले. स्थानिक पाणीपुरवठा व्यवस्थापन समितीसोबत जिल्हा परिषद सदस्यांनी तालुकास्तरावर बैठका घेऊन प्रत्येक महिन्याला पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्याभरात सर्वत्र राबविण्यात येणा:या पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्यासाठी जलव्यवस्थापन समितीची शुक्रवारी सभा झाली.
चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणा सीम, हातले तांडा, वाकडी इत्यादी गावांमधून नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आदेश देण्यात आल्याचे सागंण्यात येऊन जलव्यवस्थापन सभेच्या बैठकीत यापुढे सिंचन, पाणीपुरवठा अभियंता, वनपाल, वीज वितरण कंपनीच्या कर्मचा:यांनी उपस्थित रहावे, असे पत्र पाठविण्यात आल्याचेही या वेळी सांगण्यात आले.
यावल तालुक्यातील दहीगाव येथील पाण्याची टाकी जीर्ण झाल्याने नवीन टाकीचे बांधकाम होणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.
भुसावळ तालुक्यातील वांजोळा-मिरगव्हाण बंधा:याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार सरपंचासहीत स्थानिक प्रतिनिधी, नागरिकांनी अनेक वेळा केली आहे. मात्र तक्रारीची दखल घेतली नसल्याने या संदर्भात जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी जलव्यवस्थापन समितीच्या सभेत मुद्दा उपस्थित केला व कारवाईची मागणी केली.