जळगावाकरांना १ एप्रिलपासून ३५० रुपयांचा भूर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:59 PM2018-12-08T12:59:18+5:302018-12-08T12:59:57+5:30

घनकचरा व्यवस्थापन अंमलबजावणीसाठी २ टक्के शुल्कवाढ

Jalgaonkar Bhartunda 350 Rupees From 1st April | जळगावाकरांना १ एप्रिलपासून ३५० रुपयांचा भूर्दंड

जळगावाकरांना १ एप्रिलपासून ३५० रुपयांचा भूर्दंड

Next
ठळक मुद्देभाजपाने दिली महासभेत मंजुरी; शिवसेनेचा विरोधशहरासाठी एकच सफाईचा ठेका

जळगाव : शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याची भाषा करणाऱ्या सत्ताधारी भाजपाने अवघ्या तीन महिन्यातच जळगावकरांवर १ एप्रिल २०१९ पासून घनकचरा व्यवस्थापनाच्या अंमलबजावणीच्या नावाखाली ३५० रुपयांचा भूर्दंड देण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या महासभेत सत्ताधाºयांनी बहुमताने हा ठराव मंजूर केला. मात्र शिवसेनेने या ठरावास विरोध दर्शविला.
३० नोव्हेंबर रोजी मनपाची महासभा स्वीकृत सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध न झाल्याच्या मुद्यावरून तहकूब करण्यात आली होती. ही तहकूब महासभा शुक्रवारी महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, आयुक्त चंद्रकांत डांगे, नगरसचिव सुभाष मराठे आदी उपस्थित होते. जळगावकरांवर लादण्यात आलेल्या या कराच्या ठरावावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये वाद झाला. तसेच बडतर्फ कर्मचाºयाला कामातून मुक्त करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावावरून कैलास सोनवणे व आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्यात देखील शाब्दिक चकमक झाली.
समांतर रस्त्याला अडसर ठरणाºया महावितरणच्या पोल स्थलांतरासाठी लागणाºया दिड कोटी रुपयांचा खर्च आमदार सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्यामुळे ‘डीपीडीसी’कडून मंजूर झाला. त्यामुळे पाईप-लाईन स्थलांतरासाठी लागणारा खर्च देखील आमदार भोळेंनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी करून डीपीडीसीकडून मंजूर करून घ्यावा अशी मागणी नितीन लढ्ढा यांनी केली. मनपाची आर्थिक परिस्थिती बेताची असताना आमदारांनी पाठपुरावा केल्यास मनपाच्या खर्चाची बचत होईल.
शहरासाठी एकच सफाईचा ठेका
११ आॅक्टोबर रोजी झालेल्या महासभेत सत्ताधाºयांनी शहरात प्रभागनिहाय चार सफाईचे ठेके देण्याचा ठराव केला होता. मात्र, शहरासाठी एकच सफाईचा ठेका असावा यासाठी सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक आग्रही असल्याने या महासभेत गेल्या महासभेच्या इतिवृत्तात बदल करून संपूर्ण शहरासाठी एकच सफाईचा ठेका देण्याचा ठराव करण्यात आला.
आधी सुविधा द्या, मगच करवाढ करा- नितीन लढ्ढा
प्रशासनाकडून हा प्रस्ताव मांडल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी तीव्र आक्षेप घेत. शहरातील नागरिक आधीच सफाईच्या नावावर २ टक्के कर भरत आहेत. त्या बदल्यात नागरिकांना मनपा प्रशासनााकडून कुठल्याही सुविधा दिल्या जात नाही. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त शुल्क आकारणे चुकीचे असल्याचे लढ्ढा म्हणाले. त्यावर उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी हा कर मनपाकडून नाही तर शासनाकडून असल्याचे सांगितल. शासनाकडून हा कर लावण्यात येत असला तरी या प्रस्तावाला सभेची मंजुरी योग्य नसल्याचे लढ्ढा म्हणाले.
समांतर रस्ते : पाईप-लाईन स्थलांतरासाठी ३ कोटी
शहरातील महामार्गलगत होणाºया समांतर रस्त्याच्या कामासाठी अडसर ठरणाºया मनपा पाणी पुरवठ्याच्या पाईप-लाईन स्थलांतराच्या ३ कोटी रुपयांच्या खर्चास महासभेने बहुमताने मंजुरी दिली. आधी पाईप-लाईनसाठी २ मीटर खोदकाम करावे लागणार होते. त्यामुळे मनपाने पाईप-लाईन स्थलांतरासाठी आधी २ कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र,आता पाईप-लाईनसाठी ३ मीटर खोदकाम करण्यात येणार असून, समांतर रस्ते व महामार्गाच्या मध्यभागी ही पाईप-लाईन स्थलांतरित करण्यात येणार असल्याने १ कोटी रुपयांची वाढीव तरतूद करण्याचा निर्णय मनपाने घेतला असल्याची माहिती भाजपाचे गटनेते भगत बालानी यांनी सभेत दिली.
निर्बिजीकरणासाठी दीड कोटी मंजूर
शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे मोकाट कुत्र्यांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया मनपाकडून करण्यात येणार आहे. यासाठी शहरात डॉगरुम तयार करण्यात येणार आहे. तसेच काही डॉग व्हॅन देखील मनपाला खरेदी कराव्या लागणार आहेत अ‍ॅनीमल वेलफेअर आॅफ इंंडियाशी संलग्नित असलेल्या एका संस्थेवर ही जबाबदारी असेल. दिड कोटी रुपयांच्या खर्चास महासभेने मंजुरी दिली.
भाजपाकडून आमदारांना अडचणीत आणण्याचे षडयंत्र
मनपाने नागरिकांना चांगल्याप्रकारे आरोग्याच्या सुविधा देणे गरजेचे असून, त्या सुविधा दिल्या नंतरच त्यांच्याकडून कर वसुली करण्याचा सल्ला लढ्ढा यांनी दिला. तसेच शुल्क वाढवले तर भाजपाच्या प्रतिमेला धक्का पोहचेल असेही लढ्ढा म्हणाले. हा ठराव मंजूर करून आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश भोळे यांना अडचणीत आणण्याचे षडयंत्र सत्ताधाºयांकडून करण्यात येत असल्याचा आरोप नितीन लढ्ढा यांनी केला. त्यांच्या या आरोपाने सभागृहात हशा पिकला.

Web Title: Jalgaonkar Bhartunda 350 Rupees From 1st April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव