थंडीने जळगावकर गारठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 06:17 PM2018-12-17T18:17:59+5:302018-12-17T18:23:08+5:30

उत्तरेकडून येणाºया थंड वाºयांमुळे राज्यभर थंडीची लाट असली तरीही इतर जिल्ह्यांचा तूलनेत जळगाव व धुळ्याला थंडीची अधिक तीव्रता जाणवतेय

Jalgaonkar is cold and cold | थंडीने जळगावकर गारठले

थंडीने जळगावकर गारठले

Next
ठळक मुद्देपारा १० अंशावर स्थिरवाऱ्यांमुळे दिवसाही गारवातीन दिवस थंडीची लाट कायम राहणार

जळगाव : गेल्या आठवडाभरापासून शहराच्या किमान तापमानात सारखी घट होत आहे. चार दिवसांपासून शहराचा किमान पारा १० अंशावर स्थिर असल्यामुळे जळगावकर गुलाबी थंडीने गारठले आहे. उत्तरेकडून येणाºया थंड वाºयांमुळे राज्यभर थंडीची लाट असली तरीही इतर जिल्ह्यांचा तूलनेत जळगाव व धुळ्याला थंडीची अधिक तीव्रता जाणवतेय, अजून तीन दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
यंदा थंडीच्या प्रमाणात सारखाच चढ-उतार पहायला मिळत आहे. आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस थंडीचा कडाखा वाढला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा थंडी गायब झाली होती. त्यानंतर दिवाळीच्या चार दिवसात देखील किमान पारा ११ अंशापर्यंत खाली आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली होती. नोव्हेंबर महिन्यात किमान सरासरी तापमान १६ ते १८ अंशपर्यंत कायम होते. १५ डिसेंबर पर्यंत १२ ते १४ अंशपर्यंत किमान तापमानाचा पारा कायम राहील आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्यात पारा याच सरासरीने कायम राहणार आहे. थंडीच्या लाटेचा परिणाम जनजीवनावर देखील झालेला पहायला मिळत आहे. नागरिकांनी त्यानुसार आपल्या दैनंदिन कामकाजात देखील बदल केलेला दिसून येत आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला येणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यामध्ये युवकांसोबत ज्येष्ठ नागरिकांचीही संख्या लक्षणीय आहे.
रब्बीच्या पिकांच्या वाढीसाठी थंडी लाभदायक
आठवडाभरापासून पडणाºया कडाक्याच्या थंडीमुळे रब्बीच्या गहु, हरभरा व मका पिकाला चांगला लाभ मिळत आहे. थंडीसह आर्द्रतेचे प्रमाण देखील वाढल्यामुळे वातावरणात दव देखील वाढले आहे. त्यामुळे रब्बीच्या पिकांना पाणी भरणा करण्याची खुप कमी पडत आहे. तालुक्यात रब्बी हंगामाची जवळ-जवळ ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पेरणी झालेल्या पिकांच्या वाढीला थंडी लाभदायक ठरत आहे. दरम्यान, केळीला मात्र, अतीथंडीचा फटका बसत असून, त्यामुळे केळीवर करपा रोज वाढण्याची शक्यता आहे.
थंडीचे वातावरण न मानवणाºयांना सर्दी, खोकल्यासह सांधेदुखीचा त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे दवाखान्यांमधील रुग्णांची संख्याही वाढली आहे. तसेच दिवसाही गरम वस्तूंमधून ऊब मिळविण्याची गरज भासू लागली आहे. दोन दिवसांपासून सर्दी-खोकल्याच्या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. दरम्यान, थंडीपासून बचावासाठी कानाला रुमाल व अंगात स्वेटर घालण्याचे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे. गरम पाण्याची वाफ घेतल्यास सर्दी कमी होण्यास मदत होते असा सल्ला सर्जन डॉ.उत्तम चौधरी यांनी दिला आहे.
दरम्यान, या आठवड्यात थंडीच्या प्रमाणात घट होण्याची शक्यता असून, पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. तसेच काही दिवस ढगाळ वातावरण देखील जिल्ह्यात पहायला मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Jalgaonkar is cold and cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.