सुदृढ आरोग्यासाठी धावले जळगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 01:20 PM2017-10-01T13:20:48+5:302017-10-01T13:21:37+5:30

जळगाव रनर्स ग्रुपचा पुढाकार : डॉक्टर्स, वकील, उद्योजकांसह महिलांनी घेतला सहभाग

Jalgaonkar run for healthy health | सुदृढ आरोग्यासाठी धावले जळगावकर

सुदृढ आरोग्यासाठी धावले जळगावकर

Next
ठळक मुद्दे30मिनिटात 4 किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण6 ते 78 वयोगटातील नागरिक सहभागी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 1 - ‘दौडो जिंदगीके लिए’ हे ब्रीदवाक्य घेऊन जळगाव रनर्स ग्रुपतर्फे शनिवारी सकाळी विजयादशमीच्या मुहूर्तावर ‘सिटी रन’चे आयोजन करण्यात आले होते. यात 30मिनिटात 4 किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण केले. धावण्याच्या या उपक्रमात शहरातील 6 ते 78 वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते. शहरातील  डॉक्टर्स, वकील, अधिकारी, उद्योजक अशा विविध क्षेत्रातील लोकांनी यात सहभाग नोंदवला. यात सहभागी महिलांसह लहान मुलांची संख्याही मोठी होती.
धावणे हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असल्याने या विषयाबाबत अधिक माहिती व्हावी या दृष्टीने जळगाव रनर्स ग्रुप तर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 115 जणांनी एक सारख्या टी-शर्ट मध्ये यात सहभाग नोंदवला.
सागर पार्क  येथे सर्व जण सकाळी 6 वाजता एकत्र आले. साडेसहा वाजता डॉ.चंद्रशेखर सिकची यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून धावण्यास सुरुवात करण्यात आली. काव्यर}ावली चौक, गणपती मंदिर, महाबळ चौक,  काव्यर}ावली चौक मार्गे पुन्हा सागर पार्क येथे शेवट करण्यात आले.
जे नागरिक कधी एक किलोमीटरही धावले नाही, ते ही या उपक्रमात चार किलोमीटर धावले. माङयाकडून हे होणार नाही असा न्यूनगंड असलेले व नावख्यानी हे अंतर सहज पूर्ण केले. डॉ.चंद्रशेखर सिकची, डॉ.नंदिनी आठवले, डॉ.तुषार उपाध्ये, डॉ.विद्याधर दातार, डॉ.तिलोत्तमा गाजरे, अॅड.सागर चित्रे, सतीश मंडोरा, मनोज अडवाणी, डॉ.तृप्ती बढे, डॉ.कविता शास्त्री, डॉ.कीर्ती देशमुख यांच्यासह 115 जण सहभागी झाले होते.

 

Web Title: Jalgaonkar run for healthy health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.