भरदुपारी हरविली जळगावकरांची ‘सावली’

By admin | Published: May 26, 2017 06:05 PM2017-05-26T18:05:40+5:302017-05-26T18:05:40+5:30

वर्षातून दोन वेळा घडणारी भौगोलिक घटना : उन्हाची पर्वा न करता खगोलप्रेमींनी अनुभवला दिवस

Jalgaonkar's 'Shadow' | भरदुपारी हरविली जळगावकरांची ‘सावली’

भरदुपारी हरविली जळगावकरांची ‘सावली’

Next

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.26 -‘सावली कधीही आपली साथ सोडत नसते’ अशी म्हण आपल्याकडे कायम आहे. मात्र उन्हाच्या असह्य झळांनी त्रस्त असलेल्या जळगावकरांना शुक्रवारी दुपारी 12.25 वाजता ‘शून्य सावली’ चा अनुभव घेतला. शुक्रवारी आपली स्वत:ची सावली आपल्या पासून अदृश्य झाल्याचा अनुभव जळगावकरांनी घेतला. वर्षातून दोन वेळा घडणा:या या खगोलीय घटनेनिमित्त शुक्रवारी दुपारी 12 वाजून 25 मिनीटांनी सूर्य डोक्यावर आल्याने स्वत:ची सावली हरविल्याचा अनुभव जळगावकरांनी दुपारी 5 ते 6 सेकंदासाठी झाला. 
शुक्रवारी दुपारीच्या सावलीच्या घडय़ाळानुसार दुपारी 12 वाजता आणि मनगटावरील घडय़ानुसार 12.25 वाजता जळगावचा शुन्य सावली दिवस अनुभवास आला.  26 मे रोजी ख:या अर्थाने सूर्य आपल्या डोक्यावर येतो. या दिवश्ी सूर्यकिरण लंबरूप  पडत असल्याने कोणत्याही वस्तूची इकडे-तिकडे न पडता पायापाशी पडते आणि शून्य  सावली ही अनुभवयास मिळते. 
अनेकांनी केले होते नियोजन
शून्य सावलीच्या घटना या वर्षातून दोन वेळा होत असतात. मात्र 18 जूलै रोजी होणा:या या घटनेच्या दिवशी पावसाळा असल्याने ब:याच वेळा आभाळ असते यामुळे या घटनेचा अनुभव घेता येत नसतो. मात्र शुक्रवारी या खगोलीय घटनेच्या अनुभव घेण्यासाठी खगोलप्रेमींमध्ये उत्सुकता दिसून आली. उन्हाचा तडाखा जाणवत असताना शहरातील अनेक खगोलप्रेमींनी दुपारी आपल्या छतावर जावून या ‘शून्य सावली’चा अनुभव घेतला. शहरातील खगोल अभ्यासक अमोघ जोशी, सतीश पाटील यांनी  खास खगोलप्रेमींसाठी या दिवसासाठी खास व्यवस्था केली होती. 
सावली गायब होण्याचे कारण
पृथ्वीचा अक्ष तिच्या सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या कक्षेस लंब नसून साडेतेवीस अंशानी कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात. आणि सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन होते. दररोज सूर्योदय व सूर्यास्ताची क्षितिजावरची जागा बदलत असते. सुमारे 23 डिसेंबर ते 21 जून सूर्याचे उत्तरायण असते तर त्यानंतर दक्षिणायन. या दरम्यान दोन असे दिवस येतात की मध्यानाच्या वेळी सूर्य बरोबर डोक्यावर येतो. त्या वेळी प्रत्येक सरळ उभ्या वस्तूची सावली बरोबर त्याच्या पायाखाली असते आणि काही वेळासाठी ती नाहीशी होते, जळगावचा रेखांश हा 21 अक्षावर आहे. याच अक्षावर शुक्रवारी सूर्योदय झाल्याने जळगावात शून्य दिवस निर्माण झाला. हा दिवस 26 मे व 18 जुलै रोजी अनुभवता येत असतो. 

Web Title: Jalgaonkar's 'Shadow'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.