उन्हाळी सुटय़ांसाठी जळगावकरांची सिक्कीम, दार्जिलींग ला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2017 12:54 PM2017-04-02T12:54:52+5:302017-04-02T12:54:52+5:30
यंदाच्या उन्हाळी सुट्टय़ांसाठी जळगावकरांची पसंती ही सिक्कीम, दार्जिलींग, नेपाळसह राज्यातील कोकण, महाबळेश्वर या ठिकाणांना मिळत आहे.
Next
युवकांचा कल जंगल सफारीकडे : सुटय़ांचे आखले जातेय नियोजन
जळगाव, दि.2- दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्याने युवकांकडून सुट्टय़ांचे नियोजन केले जात आहे. जळगावच्या वाढत्या तापमानातून थोडा काळ दिलासा मिळावा यासाठी थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा बेत जळगावकरांचा दिसून येत आहे. यंदाच्या उन्हाळी सुट्टय़ांसाठी जळगावकरांची पसंती ही सिक्कीम, दार्जिलींग, नेपाळसह राज्यातील कोकण, महाबळेश्वर या ठिकाणांना मिळत आहे. तर युवकांचा कल हा मेळघाट, कान्हा अशा अभयारण्याकडे वाढला आहे.
सध्या दहावी, बारावीच्या विद्याथ्र्याना सुट्टय़ा लागल्या आहेत. त्यामुळे या सुट्टय़ांमध्ये विविध ठिकाणी जावून सुट्टय़ांचा आनंद घेण्यावर भर विद्याथ्र्याकडून दिला जात आहे. सहकुटुंब पर्यटनस्थळी जाण्यावर जळगावकरांचा भर दिसून येत आहे. यासाठी सिक्कीम व दार्जिलींग या ठिकाणी जाण्यावर कल दिसून येत आहे.
‘काश्मिर’ला जाणा:या पर्यटकांच्या संख्येत घट
गेल्या वर्षी उन्हाळी सुट्टीसाठी जळगावकरांची पसंती ही काश्मिर व हिमाचल प्रदेशला होती. मात्र काश्मिर मधील वादाची स्थिती पाहता यंदा जळगावकरांचा कल काश्मिर ऐवजी सिक्कीम कडे वाढत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत काश्मिर कडे जाणा:या पर्यटकांच्या संख्येत 30 टक्कयांची घट झाल्याची माहिती विणा वर्ल्ड जळगाव शाखेचे सचिन पाटील यांनी दिली. तसेच 2015 मध्ये नेपाळ मध्ये आलेल्या भुकंपामुळे 2016 मध्ये जळगावकरांनी नेपाळला न जाणेच पसंत केले होते. मात्र यंदा नेपाळला जाणा:या पर्यटकांची संख्या वाढली आहे.
युवकांचा कल व्याघ्रदर्शनाकडे
परीक्षा संपल्याने आता बारावीचा विद्यार्थी तणावमुक्त झाले आहेत. तसेच पदवी, पदव्यूत्तरच्या परीक्षा एप्रिल महिन्याचा दुस:या आठवडय़ात संपणार आहेत. त्यामुळे एखाद्या धार्मिक किंवा थंड हवेच्या ठिकाणी न जाता युवकांकडूून मेळघाट, कान्हा, ताडोबा अशा अभयारण्यांचा सफरीवर जाण्याकडे भर दिसून येत आहे. हिवाळा व उन्हाळ्यात या ठिकाणी जाण्यावर पर्यटकांचा कल असतो. त्यामुळे जंगल पर्यटनाकडे जळगावच्या युवकांचा कल वाढत असल्याची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेचे बाळकृष्ण देवरे यांनी दिली. तापमानाचा वाढलेला पारा पाहता, अनेकांची पसंती परराज्यात न जाता शिरपूर, शिर्डी येथील वॉटर पार्कच्या ठिकाणी जावून एका दिवसाचा सहलीवर देखील दिसून येत आहे.