डोंबिवली रेल्वे स्थानकावरुन जळगावचा १४ वर्षाचा मुलगा गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 12:18 PM2019-09-04T12:18:40+5:302019-09-04T12:20:41+5:30
शिकवणीसाठी घराबाहेरुन पडलेला गौरव दिनकर पाटील (१४, रा.पीएनटी कॉलनी, डोंबिवली पूर्व, जि.ठाणे) हा मुलगा डोंबिवली रेल्वे स्थानकावरुन मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता गायब झाला. बुधवारी रेल्वे स्थानक परिसरात गौरव याची सायकल सापडली.
href='https://www.lokmat.com/topics/jalgaon/'>जळगाव : शिकवणीसाठी घराबाहेरुन पडलेला गौरव दिनकर पाटील (१४, रा.पीएनटी कॉलनी, डोंबिवली पूर्व, जि.ठाणे) हा मुलगा डोंबिवली रेल्वे स्थानकावरुन मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता गायब झाला. बुधवारी रेल्वे स्थानक परिसरात गौरव याची सायकल सापडली. दरम्यान, त्याचे अपहरण झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. हा मुलगा जळगाव जिल्ह्यातील लोण, ता.एरंडोल येथील मुळ रहिवाशी आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव पाटील हा आठवीच्या वर्गात डोंबिवली येथे शिक्षण घेतो. रोज सकाळी शिकवणीसाठी तो सायकलने जातो. घरापासून जास्त अंतर नसल्याने तो सायकलनेच जातो. मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता तो डोंबिवली रेल्वे स्टेशनपासून गायब झाला. शिकवणीच्या ठिकाणी पोहचला नाही व घरीही आला नाही म्हणून पालकांनी त्याचा शोध घ्यायला सुुरुवात केली. डोंबिवली रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमे-यात तो कैद झालेला असून दप्तर व रेनकोट त्याच्याजवळ आहे. एका कॅमेºयात तो एकटा प्लॅटफार्मवर आहे तर दुसºया कॅमेºयात तो एका महिलेसोबत जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्याचे अपहरण झाल्याचा संशय आहे. चुकून तो लोकल गाडीत बसला असावा अशीही शक्यता आहे. नातेवाईक व पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. गौरव याचे वडील डोंबिवली येथे बांधकाम कंत्राटदाराकडे कामाला आहेत. जळगाव जिल्ह्यताल लोण, ता.एरंडोल येथील ते मुळ रहिवाशी आहेत. हा बालक कुठे आढळला तर डोंबिवली पोलीस व नातेवाईकांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.