‘कोरोना’शी लढा..... जळगावकरांचा ‘संचार बंद’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 12:23 PM2020-03-22T12:23:41+5:302020-03-22T12:25:22+5:30
उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचा शहरवासीयांचा निर्धार
जळगाव : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी रविवार, २२ मार्च रोजी पाळण्यात येत असलेल्या ‘जनता कर्फ्यू’मध्ये जळगावकर उत्फूर्तपणे सहभागी झाले असून या कोरोनाला हद्दपार करण्यासाठी विविध संघटनांनी बंद ठेवला आहे. प्रशासनाच्यावतीनेदेखील नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २२ रोजी सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत नागरिकांनीच ‘जनता कर्फ्यू’ पाळावा, असे आवाहन केले आहे. त्यास सर्वच स्तरातून पाठिंबा मिळण्यासह स्वत: सहभागी होण्याचा निर्धार केला जात आहे. यात व्यापारनगरी असलेल्या जळगावातील बाजारपेठाच बंद ठेवल्या आहेत. तसेच औद्योगिक वसाहत, विविध दुकाने, हॉटेल व इतर सर्व अस्थापना बंद असून कोणीही घराबाहेर पडणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.