जळगावचा पारा 8.6 अंशावर, शहरवासीयांना हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:38 PM2017-12-30T12:38:23+5:302017-12-30T12:43:42+5:30

यंदाच्या मोसमातील निच्चांक

Jalgaon's temprature to 8.6 degrees | जळगावचा पारा 8.6 अंशावर, शहरवासीयांना हुडहुडी

जळगावचा पारा 8.6 अंशावर, शहरवासीयांना हुडहुडी

Next
ठळक मुद्देथंडीचा कडाका वाढलारात्री व पहाटे गारठा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 30- यंदाच्या हिवाळ्यात प्रथमच किमान तापमानात मोठय़ा प्रमाणावर घसरण होऊन पारा 8.6 अंशावर गेल्याने थंडीचा कडाका वाढला आहे.
आठवडय़ाभरापासून  थंडीचा जोर वाढला आहे.  रात्रीपासून सकाळी उशिरार्पयत जोरदार गारवा व थंडी जाणवत आहे.  डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला कमाल तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 ते 17 अंश सेल्सीअसच्या दरम्यानच होते. त्यामुळे रात्री किंचीत गारवा जाणवत होता. 
मात्र रविवार, 24 डिसेंबरपासून किमान तापमानात घसरणीला सुरूवात झाली. 24 रोजी कमाल तापमान 29.6 व किमान तापमान 9.4 अंशांवर घसरले. त्यानंतर कमाल तापमान 29 ते 31 अंशांदरम्यान स्थिर असले तरी किमान तापमानात चढउतार सुरूच होता. 26 रोजी किमान तापमान 10 अंशांवर, 27 रोजी 10.4 अंशावर गेले. 
मात्र 28 डिसेंबरपासून तापमानात पुन्हा घसरणीस सुरूवात झाली असून 28 रोजी 9 अंशावर तर 29 डिसेंबर रोजी तापमान यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी म्हणजे 8.6 अंशांवर पोहोचले आहे. त्यामुळे शहरवासीयांना हुडहुडी भरली आहे. 
रात्री व पहाटे गारठा
दुपारचे 4-5 तास आल्हाददायक वातावरण असते. तर रात्री व पहाटे चांगलाच गारठा जाणवत आहे.  चहा, कॉफी या पेयांना मागणी वाढली आहे. तसेच गरम कपडय़ांची मागणी व वापर वाढला आहे. 

Web Title: Jalgaon's temprature to 8.6 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.