जळगावचे वाघूर धरण ९९ टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 01:15 PM2020-08-30T13:15:02+5:302020-08-30T13:15:43+5:30

हतूनरचे ३६ दरवाजे उघडले

Jalgaon's Waghur Dam is 99 percent full | जळगावचे वाघूर धरण ९९ टक्के भरले

जळगावचे वाघूर धरण ९९ टक्के भरले

googlenewsNext

जळगाव : जिल्ह्यात गेल्या २४ तासापासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यात मोठी वाढ होत आहे. हतनूर धरणाचे ३६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. त्यामुळे तापी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाघूर धरणही ९९ टक्के भरले असल्याने धरणाचे दरवाजे केव्हाही उघडण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळपासून पावसाला सुरुवात झाली. संततधार पावसामुळे हतनूर धरणाचे ३६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. धरणातून १ लाख २१ हजार ४३० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे तापी नदीकाठच्या नागरिकांना नदीपात्रापासून सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दुसरीकडे वाघूर धरणाची पाणी पातळी २३३.८०० मीटर झाली आहे. धरणसाठा ९९.६० टक्के झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
चाळीसगाव, पाचोरा,भडगाव आणि जळगाव तालुक्यांना वरदान ठरणारे गिरणा धरण आतापर्यंत ७२ टक्के भरले आहे.

धरण साठा
हतनूर--४४.३१ टक्के
गिरणा--७२.९६ टक्के
वाघूर_ ९९.६० टक्के

Web Title: Jalgaon's Waghur Dam is 99 percent full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव