जळगाव मनपा निवडणूक : मतदानाला पैसे वाटप व हाणामारीचे गालबोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 01:26 PM2018-08-02T13:26:04+5:302018-08-02T13:27:07+5:30

आचारसंहिता भंगच्या २५ तक्रारी

Jalgoan Municipal Election: Allocation of money to the voting and the mob violence | जळगाव मनपा निवडणूक : मतदानाला पैसे वाटप व हाणामारीचे गालबोट

जळगाव मनपा निवडणूक : मतदानाला पैसे वाटप व हाणामारीचे गालबोट

Next
ठळक मुद्देगेंदालाल मील, शिवाजीनगरात हाणामारीधमकी दिल्याने गुन्हा दाखल

जळगाव : महानगरपालिकेसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नसला तरी गेंदालाल मील, शिवाजी नगर, दूध फेडरेशन, जानकी नगर या भागात किरकोळ हाणामारीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी खुलेआम पैशांचे वाटप झाले. समता नगर परिसरातील स्टेट बॅँक कॉलनीच्या मागे तर भुसावळ येथील नगरसेवकाच्या कारमध्येच उमेदवाराने पैसे पकडले. त्यामुळे या निवडणुकीला हाणामारी व पैसे वाटपाचे गालबोट लागले. प्रभाग १६ मध्ये तर एका उमेदवाराने मतदारांना पैशांचे आमिष दिले मात्र मतदानानंतर पैसे न दिल्याच्या आरोपावरुन महिलांनी त्याला शिव्यांची लाखोली वाहिली. पैसे वाटप करताना अनेक उमेदवारांनी प्रशासनाचा धाक बाळगलाच नाही. किंबहूना प्रशासकीय व पोलीस यंत्रणेने देखील पैसे वाटपाची प्रक्रिया रोखण्याची तसदी घेतली नाही.
प्रिया कोल्हे यांना धमकी दिल्याने गुन्हा दाखल
सेंट लॉरेन्स स्कूलच्या मतदान केंद्रात चार चाकीमधून जेवण तसेच भांडे नेत असताना त्याचा जाब विचारणाऱ्या राष्टÑवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रिया अमोल कोल्हे (वय २३, रा.ईश्वर कॉलनी, जळगाव) यांना अश्लिल शिवीगाळ करुन हात पिरगळत, उद्याची निवडणूक होऊ दे तुला व तुझ्या नातेवाईकांना पाहून घेवू अशी धमकी दिल्याचा प्रकार ईश्वर कॉलनीत घडला. याप्रकरणी बुधवारी पहाटे कुंदन काळे, चंद्रशेखर अत्तरदे, दीपक चौधरी, दिनेश अत्तरदे व इतर ७ ते ८ जण यांच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला भादवि कलम १४३, ५०९,५०४, ५०६ पोलीस अधिनियम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्मचाºयांना सरबराईद्वारे लाच दिल्याप्रकरणी गुन्हा
सेंट लॉरेन्स शाळेच्या मतदान केंद्रात ड्युटीला असलेले अधिकारी, कर्मचारी यांना पोळी, भाजी, कांदा, लिंबू असे जेवणाचे साहित्याची सरबराईद्वारे लाच देण्याचा प्रयत्न केला म्हणून चार चाकी गाडी क्र.एम.एच.१९ ए.एक्स. ११०९ वरील चालक व त्याच्यासोबत असलेला आणखी एक अशा दोघांविरुध्द एमआयडीसी पोलिसात भादवि कलम १७१ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. मनपाचे शाखा अभियंता मिलिंद काशिनाथ जगताप यांनी फिर्याद दिली आहे.
बोगस मतदानाचा प्रयत्न मेहरुणमध्ये एकास अटक
बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणाºया रवींद्र बबनराव जाधव (वय २८, रा. जोशी वाडा, जळगाव) याला बुधवारी सायंकाळी मेहरुणमधील के.जी.मणियार प्राथमिक विद्यालयाच्या मतदान केंद्रात अधिकाºयांनीच पकडले. त्याला अटक करण्यात आली असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहरुणमधील के.जी.मणियार प्राथमिक विद्यालयाच्या मतदान केंद्र क्र.१५/१ येथे दिनेश पितांबर पाटील यांची मतदान अधिकारी क्र.१ म्हणून नियुक्ती झालेली होती. सायंकाळी साडे पाच वाजता रवींद्र जाधव हा मतदान केंद्रात आला. अधिकाºयांनी ओळखपत्राची मागणी केली असता त्याच्या खिशात रवींद्र बबन जाधव, बबन सिताराम जाधव, शोभा बबन जाधव, वंदना भगवान रोकडे व दीपाली महेंद्र जाधव या पाच जणांचे ओळखपत्र आढळून आले. तसेच त्याच्या नावासमोर आधीच मतदान झाल्याची नोंद होती.
नवनाथ दारकुंडे व अमोल सांगोरे समोरासमोर
मतदान सुरु झाल्यानंतर तासाभरातच भाजपाचे उमेदवार नवनाथ दारकुंडे आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवार अमोल सांगोरे समोरासमोर आले. त्यांच्यात चांगलाच वाद झाल्याची घटना सकाळी साडे आठ वाजता शिवाजीनगरातील मतदान केंद्रावर घडली.शिवाजीनगरकडे आपल्या कार्यकर्त्यांसोबत जाणाºया आमदार सुरेश भोळे व बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी करुन, वादावर पडदा पडला.

Web Title: Jalgoan Municipal Election: Allocation of money to the voting and the mob violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.