जळगाव मनपा निवडणूक : ३५ इमारतीत १४६ संवेदनशील केंद्रांकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 01:05 PM2018-07-29T13:05:49+5:302018-07-29T13:07:55+5:30

पोलिसांचा ‘वॉच’

Jalgoan Municipal Election: Attention to 146 sensitive centers in 35 buildings | जळगाव मनपा निवडणूक : ३५ इमारतीत १४६ संवेदनशील केंद्रांकडे लक्ष

जळगाव मनपा निवडणूक : ३५ इमारतीत १४६ संवेदनशील केंद्रांकडे लक्ष

Next
ठळक मुद्देनाशिक, अहमदनगर व नंदुरबार येथील पोलिसांची बंदोबस्तासाठी मदत घेणारशहरातील बंदोबस्त वाढविला

जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून संवेदनशील इमारत, केंद्रांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. शहरातील पाच पोलीस स्टेशनच्या हद्दीत ३५ इमारतीत १४६ केंद्र संवेदनशील आहेत. तेथे विशेष बंदोबस्त लावण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी या केंद्रांची पाहणी केल्यानंतर तेथील बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.
महापालिकेसाठी १ आॅगस्ट रोजी मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया निर्भयपणे पार पडावी व कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहचू नये यासाठी पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेले गुन्हेगार, ज्यांच्यापासून परिसरात धोका निर्माण होऊ शकतो अशा लोकांना शहराबाहेर पाठविण्यात येत आहे. तसेच शहरात वाढीव बंदोबस्त लावण्यात आला असून रात्र व दिवसाची गस्तही वाढविण्यात आलेली आहे.
शहरातील बंदोबस्त वाढविला
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनला तीन वाहने अतिरिक्त दिलेली आहेत. या प्रत्येक वाहनात एक अधिकारी व काही कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून त्यांना सतत नेमून दिलेल्या भागात गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शनिवारपासून बंदोबस्तात वाढ झालेली आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांनी निवडणुकीसाठी बाहेर जिल्ह्यातून बंदोबस्त मंजूर केला असून दोन दिवसात हा बंदोबस्त शहरात दाखल होईल.

निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज झालेले आहे. बंदोबस्ताचे नियोजनही झालेले आहे. संवेदनशील केंद्रांवर दररोज लक्ष आहे. सोशल मीडियावरील अफवा परविणाऱ्यांवरही लक्ष आहे. कुठेही गैरप्रकार अथवा अफवा पसरवून वातावरण दुषीत करण्याचा प्रयत्न झाला तर संबधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.
-सचिन सांगळे, पोलीस उपअधीक्षक

Web Title: Jalgoan Municipal Election: Attention to 146 sensitive centers in 35 buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.