जळगाव मनपा निवडणूक : अडीच लाख मतदारांना मतदार चिठ्ठ्या वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 01:19 PM2018-07-28T13:19:50+5:302018-07-28T13:20:23+5:30

४ दिवस शिल्लक

Jalgoan Municipal Election: Voter Voters Allotment to 2.5 Lakh Voters | जळगाव मनपा निवडणूक : अडीच लाख मतदारांना मतदार चिठ्ठ्या वाटप

जळगाव मनपा निवडणूक : अडीच लाख मतदारांना मतदार चिठ्ठ्या वाटप

Next
ठळक मुद्देअद्याप १ लाख मतदारांपर्यंत पोहचण्याचे आव्हानसायंकाळी सादर करावा लागतो अहवाल

जळगाव : मनपा निवडणुकीसाठी यावर्षी राज्य निवडणूक आयोगाकडून मतदारांना मतदारचिठ्ठ्या दिल्या जात आहेत. यासाठी ३५० हून अधिक बीएलओ, मनपा कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.
गेल्या आठ दिवसांपासून मतदारांच्या घरापर्यंत जावून त्यांना मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येत असून, आतापर्यंत २ लाख ४२ हजार ४४६ मतदारांना मतदार चिठ्ठ्या वाटप झाल्याची माहिती मनपा उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी दिली.
मनपा प्रशासनाकडून मतदान जागृतीसाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. मतदानाच्या दिवशी अनेक मतदारांना मतदार याद्यांमध्ये नाव न सापडण्याची अडचण निर्माण होते. यामुळे त्यांना मतदानापासून देखील वंचित राहण्याची स्थिती निर्माण होत असते.
ही स्थिती निर्माण होवू नये म्हणून यासाठी निवडणूक आयोगाकडूनच मतदारांना चिठ्ठ्यांचे वाटप केले जात आहे.
या चिठ्ठ्यांचे वाटप होत आहे की नाही. या तपासणीसाठी देखील मनपा प्रशासनाकडून काही कर्मचाºयांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.
चार दिवसात १ लाख २२ हजार मतदार चिठ्ठ्यांचे करावे लागेल वाटप
मतदानाला आता केवळ चार दिवसांचा अवधी बाकी आहे. शंभर टक्के मतदार चिठ्ठ्या वाटप करणे शक्य नाही. कारण अनेकांनी आपल्या रहिवासात बदल केला आहे. तर अनेक मतदारांचे नाव जरी मतदार यादीत असले तरी त्यांचा रहिवास इतर शहरांमध्ये आहे. अद्याप १ लाख २२ हजार ६२६ मतदारांना मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करणे बाकी असून, ३१ जुलै पर्यंतच या चिठ्ठ्यांचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर १ आॅगस्ट रोजी मतदान केंद्रावर देखील मनपाकडून मतदारांना मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती उपायुक्त कहार यांनी दिली आहे.
सायंकाळी सादर करावा लागतो अहवाल
सकाळपासून बीएलओ, मनपा कर्मचारी व आशा वर्कर यांच्या माध्यमातून मतदार चिठ्ठ्यांचे वाटप केले जात आहे. प्रत्येक बीएलओंना स्वतंत्र प्रभाग व काही भाग विभागून देण्यात आले आहेत. सायंकाळी मतदार चिठ्ठ्यांचे वाटप झाल्यानंतर प्रत्येकाला दिवसभराचा संपूर्ण अहवाल निवडणूक विभागाकडे सादर करावा लागत आहे.
ज्या मतदारांचे पत्ते सापडले नाहीत. अशा मतदारांच्या चिठ्ठ्या निवडणूक विभागात जमा केल्या जात आहेत. तसेच मतदार चिठ्ठ्या वाटप करताना संबधित मतदाराचा मोबाईल क्रमांक व सही देखील घेतली जात आहे. त्यानंतर सायंकाळी मनपा प्रशासनाकडून या मतदारांना मोबाईलव्दारे संपर्क करून त्यांना मतदार चिठ्ठ्या भेटल्या की नाही. याची देखील खातरजमा करून घेण्यात येत आहे.

Web Title: Jalgoan Municipal Election: Voter Voters Allotment to 2.5 Lakh Voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.