जळगाव मनपा निवडणूक : मतदान यंत्र बिघाडाने मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 01:33 PM2018-08-02T13:33:30+5:302018-08-02T13:34:14+5:30

कोठे मतदार ताटकळले तर कोठे मतदान थांबले

Jalgoan municipal elections: Disaster in the polling booth | जळगाव मनपा निवडणूक : मतदान यंत्र बिघाडाने मनस्ताप

जळगाव मनपा निवडणूक : मतदान यंत्र बिघाडाने मनस्ताप

Next
ठळक मुद्देअर्धातास थांबवले मतदानपिंप्राळ्यात अर्धातास मतदान यंत्र बंद

जळगाव : मनपा निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर अनेक मतदान केंद्रांवर मतदान यंत्रातील बिघाडाने मतदान थांबले तर कोठे मतदारांना ताटकळत थांबावे लागले. यामुळे मतदारांना मनस्ताप होण्यासह गोंधळही उडाला.
अर्धातास थांबवले मतदान
प्रभाग ११ मधील बहिणाबाई ज्ञान विकास माध्यमिक विद्यालयातील बुथ क्रमांक १ मध्ये मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे अर्धातास मतदान थांबविण्यात आले होते. यामुळे या ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या. तत्काळ मतदान यंत्राची दुरुस्ती केल्यानंतर १०.३० वाजेपासून मतदानाला पुन्हा सुरुवात झाली.
प्रभाग १२ व प्रभाग ११ मधील काही मतदार केंद्रावर मतदारांना मतदार याद्यांमध्ये नावे सापडले नाही. त्यामुळे बहिणाबाई माध्यमिक विद्यालय, भोईटे शाळा, भगीरथ शाळेमधील मतदान कें द्रावर अनेक मतदार नाव न सापडल्याने मतदान न करताच परत गेले. विधानसभेच्या मतदार यादीवरुन मतदार यादी तयार करण्यात आल्यामुळे ज्या मतदारांचे नाव विधानभसभेच्या यादीत नाही अशा मतदारांचे नावे या यादीत देखील असणार नसल्याची माहिती मनपा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
मतदारांचा गोंधळ
प्रभाग क्रमांक १९मध्ये एकाच वेळी चार उमेदवारांना मतदान करायचे असल्याने अनेक मतदारांचा गोंधळ उडाला. काही मतदारांचा समज असा झाला की, एकदा एक चिन्ह दाबले की चार वेळेस तेच चिन्ह दाबावे लागते. यामुळे ज्यांना क्रॉस वोटींग करायचे आहे, अशांनी काहींनी सरसकट एकाच पक्षाला मतदान केल्याची माहिती मिळाली.
असा उडाला गोंधळ
प्रभाग क्रमांक १९मध्ये एका मतदारास पक्ष पाहून नव्हे तर उमेदवार पाहून मतदान करायचे होते. दोन या पक्षाला तर दोन त्या पक्षाला. मात्र मतदान यंत्र पाहून या मतदाराचा गोंधळ उडाला. समज असा झाला की, सुरुवातीला ज्या चिन्हाचे बटन दाबले. त्याच चिन्हावर चारही वेळेस बटन दाबायचे आहे. यामुळे त्याने चारही एकाच चिन्हाचे बटन दाबले. बाहेर आल्यावर जेव्हा समजले की, वेगवेगळया चिन्हाचे बटन दाबून वेगवेगळ्या चारही जणांना मतदान करता येणार आहे, त्यावर मतदार हताश झाला.
माझे दोन मत नाईलाजाने दुसरीकडे गेले, अशी प्रतिक्रिया या मतदाराने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पिंप्राळ्यात अर्धातास मतदान यंत्र बंद
पिंप्राळा परिसरातील सेमी इंग्रजी मनपा शाळा क्रमांक ३५ मध्ये सकाळी ९ वाजता तांत्रिक अडचणीमुळे ईव्हीएम मशिन अचानक बंद पडल्याचा प्रकार घडला़ यामुळे तब्बल अर्धातास मतदारांना रांगेत ताटकळत उभे रहावे लागले़ सकाळी मतदानाच्या दोन तासात पिंप्राळा, गणेश कॉलनी, निमखेडी रस्ता, खोटेनगरमधील मतदान केंद्रांवर धीम्यागतीने मतदान सुरू होते़ मात्र, साडे दहा वाजेनंतर या परिसरातील मतदान केंद्रांवर मतदारांची चांगलीच गर्दी वाढलेली होती़ गणेश कॉलनीतील प.न. लुंकड कन्या शाळेतील केंद्रावर सकाळपासून तर सायंकाळपर्यंत गर्दी होती.
बोगस मतदानाची अफवा
दरम्यान, इंग्रजी मनपा शाळा क्रमांक ३५ या केंद्रात दुपारी बोगस मतदान झाल्याची अफवा पसरली़ मात्र, याबाबत लोकमतने शहानिशा केली असता कुठलाही प्रकार केंद्रात घडला नसल्याचे केंद्रातील कर्मचाºयांनी सांगितले़
मतदाराकडे दोन चिठ्ठया असल्यामुळे हा गैरसमाजातून अफवा पसरविण्यात आली असल्याची त्यांनी सांगितले़

Web Title: Jalgoan municipal elections: Disaster in the polling booth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.