जामनेर येथे युवकांच्या पुढाकारातून बहरली वृक्षवल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 02:45 PM2019-06-04T14:45:19+5:302019-06-04T14:50:51+5:30
जामनेर येथील बिस्मिल्ला नगरमधील युवकांनी स्वयंप्रेरणेने व स्वखचार्ने कब्रस्तानात तीन वषार्पूर्वी लावलेली सुमारे शंभराहून अधिक झाडे जगली असून, पर्यावरण संवर्धनाचे ते एक उत्तम उदाहरण ठरत आहे.
सय्यद लियाकत
जामनेर, जि.जळगाव : येथील बिस्मिल्ला नगरमधील युवकांनी स्वयंप्रेरणेने व स्वखचार्ने कब्रस्तानात तीन वषार्पूर्वी लावलेली सुमारे शंभराहून अधिक झाडे जगली असून, पर्यावरण संवर्धनाचे ते एक उत्तम उदाहरण ठरत आहे.
सर्वत्र बेसुमार वृक्षतोड होऊन पर्यावरणाचा ºहास होत असल्याची ओरड होत असताना येथील बिस्मिल्लानगर मधील युवकांनी तीन वर्षांपूर्वी त्यांच्या भागातील कब्रस्तानात विहिरीचे खोदकाम केले व या विहिरीला सुदैवाने पाणी चांगले लागल्याने त्याचा वापर करून या युवकांनी कब्रस्तानात सुमारे १०० झाडे लावली. शासकीय योजनेनुसार केवळ झाडे लावून ते थांबले नाही तर त्यांनी दररोज झाडांना पाणी देऊन ती जगविली यासाठी त्यांनी संरक्षक जाळी लावून त्यांचे रक्षणही केले. आज हा परिसर वाढत असलेल्या झाडांमुळे हिरवागार दिसत आहे युवकांच्या या कामाचे नागरिक कौतुक करीत आहेत.
लागवडीबरोबर संवर्धन हवे
जामनेरलगत मोठे राखीव वनक्षेत्र आह.े काही वर्षात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याचे वनक्षेत्र ओसाड झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन गत दोन वर्षात शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड योजनेतून विविध भागातील वनक्षेत्रात रोपे लावण्यात येत आहे. मात्र या रोगनांचे संगोपन होत नसल्याचे नंतर केवळ त्या ठिकाणी खड्डे दिसतात. शासनाची ही योजना अतिशय चांगली आहे. मात्र शासकीय यंत्रणेने त्या दृष्टीने नियोजन करणे गरजेचे आहे. लावलेल्या झाडांचे संवर्धन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
धर्माधिकारी प्रतिष्ठानने जगविली ९०० झाडे
जामनेरच्या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी शहराजवळील टाकळी बुद्रुक गावात जि. प. प्राथमिक शाळेजवळ सुमारे ९ एकर मोकळ्या जागेत गेल्या तीन वर्षांपूर्वी एक हजार झाडे लावली. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी ग्रामस्थांच्या सहकायार्ने झाडे जगविण्याचा प्रयत्न केला. झाडांना संरक्षक जाळ्या लावल्याने व नियमित पाणी दिल्याने झाडांची वाढ वेगाने होत आहे. वाढत्या तापमानापासून रक्षणासाठी झाडांना ग्रीन नेट लावण्यात आली. आज हा परिसर हिरवागार झाला असून, त्याचे सारे श्रेय प्रतिष्ठानच्या सदस्यांना आहे.
सोनबर्डी हिरवी करावी
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मोठा निधी खर्चून सोनबर्डीच्या विकासाला चालना दिली. या ठिकाणी बांधलेल्या सोमेश्वर महादेव मंदिरामुळे भाविकांची वर्दळ वाढली आहे. पालिका प्रशासनाने सोनबर्डी टेकडीवर वृक्ष लागवड करुन परीसर हिरवागार करावा व पावसाळ्यातच या उपक्रमाची सुरवात करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
एकीकडे असे दृश्य
शहरातील मुख्य रस्त्यावरील डेरेदार जिवंत झाडांची तोड चौपदरीकरणासाठी सार्वजनीक बांधकाम विभागाने केल्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून ओरड होत आहे तोडण्यात आलेल्या झाडांमुळे पर्यावरणाचा मोठा ºहास झाला आहे वास्तविकत: सार्वजनिक बांधकाम विभाग व सामाजिक वनीकरण विभागाने याकडे लक्ष देऊन शहरातील रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून जगविली पाहिज,े अशी अपेक्षा आहे.
पालिकेने पुढाकार घ्यावा
गेल्या दोन वर्षांपूर्वी पालिकेने कॉलनी भागातील नागरिकांना संरक्षक जाळयांचे व कलमांचे वाटप करुन झाडे लावा, झाडे जगवा उपक्रम राबविला होता. नागरिकांच्या सहकार्याने काही भागातील झाडे जगली आहेत. यंदाच्या पावसाळ्यात पालिकेने मोकळ्या जागेवर मोठ्याा प्रमाणात वृक्ष लागवड करुन संवर्धनासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे. तसेच जळगाव रोड वरील चौपदरीकरणासाठी वृक्ष तोडण्यात आली होती. ते रस्ते आता उजाड झालेले आहत.े त्यामुळे पालिकेने पुढाकार घेऊन त्या रस्त्यावर वृक्ष लागवड करावी, अशी मागणी नागरिकांची आहे