गिरणेवरील जामदा बंधारा ओसंडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 10:11 PM2019-09-06T22:11:11+5:302019-09-06T22:11:18+5:30

कजगावसाठी सावदे केटीवेअर मध्ये सोडले पाणी : पारोळा तालुक्यातील म्हसवे तलावाचेही पुनर्रभरण

The Jamdah dam on the mills was filled | गिरणेवरील जामदा बंधारा ओसंडला

गिरणेवरील जामदा बंधारा ओसंडला

Next



खेडगाव, ता. भडगाव : गिरणेवरील जामदा बंधारा गुरुवारी ओसंडला. यामुळे कजगावला पाणीपुरवठा करणारा सावदे केटीवेअर आता या पाण्याद्वारे भरण्यात येणार आहे. यानंतर जामदा डावा कालव्याच्या माध्यमातून पारोळा तालुक्यातील म्हसवे तलावात पाणी सोडले जाणार आहे.
बंधाऱ्याच्या वरील भागात चांगला पाऊस झाल्याने बंधारा भरला असल्याची माहिती अशी माहीती कार्यकारी अंभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे, हेमंत पाटील व एस.आर पाटील यांनी दिली.
गिरणा धरणात ८२.४५ टक्के जलसाठा झाला असला तरी सध्या कोणताही विसर्ग धरणातुन केला जाणार नसल्याचेही त्यांनी सांगीतले
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे भागात चांगला पाऊस झाल्याने नदी - नाले प्रवाहीत झाले आहेत. या भागातील खडकीसिम येथील पाझरतलावही भरुन वाहु लागला आहे.
हे पाणी गिरणेवरील जामदा बंधºयात येत आहे. गुरुवारी जामदा बंधारा ओसंडत पाणी सावदे केटीवेअर कडे निघाले. ते शुक्रवारी दुपारी तीन वाजता सावदे केटीवेअरला येवुन मिळाले. या केटीवेअर मधुन कजगावला पाणीपुरवठा होतो. यामुळे कजगावसाठी गिरणा धरणातुन पाणी सोडण्याची हालचाली आता थडांवल्यात.
जामदा बंधाºयातुन होत असलेला ओव्हरफ्लो खाली पांढरदपर्यंत येवु देण्याची २२ खेड्यांची मागणी आहे. यामुळे येथील गावांची तहान आता ती या पाण्यातुन भागविण्याची आवश्यकता आहे. गिरणा नदी पावसाच्या पाण्यामुळे ठिकठिकाणी प्रवाहीत झाली आहे. आता फक्त सावदे केटीवेअर ते पांढरद हे १५-२० किमी नदीपात्र पावसाळ्यात देखील कोरडे आहे. त्याचे पुनर्रभरण या पाण्यातुन आवश्यक आहे.
‘अंजनी’ला लाभ नाही
म्हसावा व भोकरबारी तलावातील पुनार्भारणासाठी जमादा डावा कालव्याद्वारे सोडलेले पाणी चार दिवसात म्हसावा तलावा पर्यंत पोहचेल. दरम्यान अंजनी धरणाचा पुनार्भारणा मध्ये समावेश नाही.त्यामुळे पुनर्भरण लाभा पासुन अंजनी धरण वंचित राहणार आहे.
कालव्यात सोडले १०० क्यूसेस पाणी
सावदे केटीवेअर भरल्यानंतर जामदा डावा कालव्यातुन पारोळा तालुक्यातील म्हसवे तलावात पाणी सोडले जाणार आहे. यामुळे चाळीसगाव, भडगाव, पारोळा व एरंडोल तालुक्यातील कालवा मार्गात आपोआप रिचार्जचा लाभ होणार आहे.मात्र पावसाळ्याचे पाणी जामदा बंधाºयात किती दिवस चालु राहते याच्यावर पुढील पुनर्भरण अवलंबून आहे. शुक्रवारी सकाळी कालव्याची वितरण चाचणी घेण्यासाठी १०० क्युसेस पाणी त्यात सोडण्यात आले आहे. यानंतर जामदा बंधाºयात वरुन येणारा पाण्याचा फ्लो सुरुच राहील्यास कालवा ३५० क्युसेसने चालविला जाणार असल्याची माहीती भडगाव-कोळगाव शाखा अभियंता पी.टी.पाटील यांनी लोकमत ला दिली.

Web Title: The Jamdah dam on the mills was filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.