जामनेर आगाराला चार कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 04:17 PM2020-04-17T16:17:07+5:302020-04-17T16:18:20+5:30

जामनेर आगारातील तब्बल ८७ बसेसची चाके जागेवरच थांबली आहेत. यातून जामनेर आगाराला चार कोटींचा फटका बसणार आहे.

Jamner Agar hits four cr | जामनेर आगाराला चार कोटींचा फटका

जामनेर आगाराला चार कोटींचा फटका

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनचा परिणाम८७ बसेस जागेवरच

(सय्यद लियाकत /मोहन सारस्वत)
जामनेर, जि.जळगाव : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यभरात संचारबंदी सुरू आहे. परिणामी २२ मार्चपासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जामनेर आगारातील तब्बल ८७ बसेसची चाके जागेवरच थांबली आहेत. यातून जामनेर आगाराला चार कोटींचा फटका बसणार आहे. प्रति दिवस सरासरी आठ लाखांचे उत्पन्न बुडत असल्याची माहिती आगारप्रमुख कमलेश धनराळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जामनेर आगारातून जिल्ह्यासह गुजरात, मध्य प्रदेश, मुंबई, पुणे बसेस प्रवाशांच्या सेवेत धावतात. त्यासाठी जवळपास ४४० कर्मचारी कार्यरत आहेत. जामनेर आगार विभागाची दैनदिन आर्थिक उलाढाल आठ ते नऊ लाखांच्या घरात आहे. मार्च महिन्यात केवळ २२ दिवस एस.टी. बसने प्रवाशांना सेवा दिली. २२ मार्चच्या जनता कर्फ्यूनंंतर मात्र आगाराच्या ८७ बसेस जागेवरच थांबून आहेत. देशभर लॉकडाऊन सुरू असल्याने सेवाही ठप्प झाली आहे. आता लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. सध्या जवळपास ४५ ते ५० दिवस एस.टी. बसेसची चाके थांबणार आहेत. यातून दिवसाला आठ लाख रुपये या हिशोबाने तब्बल चार कोटी रुपयांवर जामनेर आगाराला पाणी सोडावे लागणार आहे. तसेच एप्रिल २०१९ मध्ये जामनेर आगाराला दोन कोटी ९६ लाख रुपये उत्पन्न मिळाले होते व जिल्ह्यात जामनेर आगार उत्पन्नात एक नंबर आले होते. मात्र यावेळी लॉकडाउनचा मोठ्या प्रमाणावर फटका जामनेर आगाराला बसला आहे.
७२ वर्षात पहिल्यांदाच थांबली बसेसची चाके
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेला जवळपास ७२ वर्षांचा कालावधी होत आहे. यामध्ये पहिल्यांदाच कोरोनामुळे बसेसची चाके थांबली आहेत. आंदोलन, संप यामुळे काही दिवस बससेवा विस्कळीत व्हायची. मात्र लॉकडाऊनने या सेवेला सध्या ब्रेक लागला आहे.

Web Title: Jamner Agar hits four cr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.