जामनेरला आयपीएलवर सट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 22:37 IST2021-04-28T22:36:38+5:302021-04-28T22:37:17+5:30
श्रीराम नगर भागात आयपीएल सामन्यांवर सट्टा घेतला जात असल्याची माहिती मिळाल्याने जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली.

जामनेरला आयपीएलवर सट्टा
लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर : शहरातील श्रीराम नगर भागात आयपीएल सामन्यांवर सट्टा घेतला जात असल्याची माहिती मिळाल्याने जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी जामनेर पोलीसांच्या मदतीने बुधवारी रात्री क्लबवर धाड टाकली. तेरा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याचे काम रात्रीपर्यंत सुरु होते.
गेल्या काही दिवसांपासून श्रीराम नगरमध्ये रहिवासी भागात अवैधरीत्या आयपीएलवर सट्टा घेतला जात होता. याची कुणकुण एलसीबीला लागल्याने त्यांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात येते. पोलीसांची धाड पडताच परिसरातील नागरीक मोठ्या संखेने जमा झाले. पोलीसांनी घराला चारही बाजूंनी वेढा घालून समोरील दरवाजाने प्रवेश करुन सर्वांना ताब्यात घेतले.
पोलीसाांनी घरातून संगणक, लॅपटॉप, आठ दुचाकी, टिव्ही स्क्रिनसह ५० हजार रोख जप्त केले. एलसीबीचे सहायक पोलीस निरीक्षक स्ववप्नील नाईक व जामनेरचे पोलीस निरीक्षक प्ररताप इंगळे यांनी सहकाऱ्यांसोबत कारवाई केली.