कोरोनाबाधिताच्या बहिणीच्या संपर्कातील दोघे तपासणीअभावी जामनेरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 06:57 PM2020-03-30T18:57:19+5:302020-03-30T18:59:10+5:30
कोरोनाबाधिताच्या बहिणीच्या संपर्कातील दोघे तपासणीअभावी जामनेरला परतले.
जामनेर, जि.जळगाव : जळगाव येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्याची बहीण व मुलांना ट्रकमधून जामनेरला आणणारे चालक व क्लिनर यांची तपासणी आरोग्य विभागाने करावी, अशी मागणी दिवसभर होत असली तरी त्याकडे प्रशासनाने डोळेझाक केल्याचे दिसून आले.
बाधिताच्या संपर्कात आलेल्या महिला व तिच्या पतीसह चार मुले यांना व ते ज्या ट्रकमधून येथे आले त्या चालक व क्लिनरला रविवारी तपासणीअभावी परतावे लागले. आमदार गिरीश महाजन यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. मात्र तपासणी झाली नाही असे समजले.
दरम्यान, ट्रकवरील चालक व वाहक सोमवारीसुध्दा घरीच असल्याने त्यांचा इतरांशी संपर्क होऊ शकतो, अशी भीती वाटत असल्याने त्यांना विलगीकरण कक्षात हलवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. याबाबत स्थानिक आरोग्य विभागाने हतबलता दाखवली.
ज्या ट्रकमधून महिला व मुले आली त्यातून येथील दुकानदारांची औषधींची खोकी आली होती. संभाव्य संक्रमणाचा धोका लक्षात घेत या दुकानदारांनी तातडीने सॅनिटायझेशन करुन घेतले यासाठी आज काही दुकाने बंद होती.