जामनेरला मुख्याध्यापकाचे घर फोडले
By admin | Published: April 30, 2017 01:31 AM2017-04-30T01:31:06+5:302017-04-30T01:31:06+5:30
सुटीमुळे बाहेरगावी गेलेल्या मुख्याध्यापकाचे बंद घर फोडून चोरट्यांनी तेरा तोळ्यांचे सोन्याचे दागिने व वीस हजार रुपये रोख असा सुमारे चार लाखांचा ऐवज लांबविला.
Next
>ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 30 - सुटीमुळे बाहेरगावी गेलेल्या मुख्याध्यापकाचे बंद घर फोडून चोरट्यांनी तेरा तोळ्यांचे सोन्याचे दागिने व वीस हजार रुपये रोख असा सुमारे चार लाखांचा ऐवज लांबविला. ही घटना जामनेर येथे घडली. चोरीचा प्रकार शनिवारी सायंकाळी उघडकीस आला.
आश्रमशाळेचे मुख्याध्यापक ईश्वर रामदास महाले हे २६ एप्रिलपासून कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते. शनिवारी दुपारी चार वाजता ते परत आले असता त्यांना घराचा समोरील दरवाजा तुटलेला दिसला. आत जाऊन पाहिले असता चोरट्यांनी कपाट फोडून त्यातील १३ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व २० हजार रुपये रोख लांबविल्याचे आढळून आले.
तपासासाठी जळगावहून श्वानपथक आणण्यात आले होते. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.