जामनेर तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 07:37 PM2020-05-15T19:37:02+5:302020-05-15T19:38:22+5:30

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शनिवार ते सोमवार तीन दिवस जामनेर शहर बंद ठेवण्याचा निर्णय तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

Jamner decided to keep it closed for three days | जामनेर तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय

जामनेर तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय

Next
ठळक मुद्देप्रशासनाने घेतली बैठक१६ ते १८ मे पर्यंत शहरातील सर्व व्यवहार बंदमात्र औषधी दुकाने व दूध विक्री सुरू राहील

जामनेर, जि.जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शनिवार ते सोमवार तीन दिवस जामनेर शहर बंद ठेवण्याचा निर्णय तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
जामनेरला अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही. भविष्यातदेखील होऊ नये यासाठी १६ ते १८ मे पर्यंत शहरातील सर्व व्यवहार बंद राहतील. मात्र औषधी दुकाने व दूध विक्री सुरू राहील. या बैठकीस तहसीलदार अरुण शेवाळे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, मुख्याधिकारी राहुल पाटील व्यापारी प्रतिनिधी, नगरसेवक उपस्थित होते.
तसेच रविवार व गुरुवार या दोन दिवशी व्यवहार बंद ठेवावे, असेही ठरले.
येथील बाजारात भुसावळ, पाचोरा,जळगाव येथून भाजीपाला येतो. स्थानिक विक्रेत्यांनी बाहेरून येणारा भाजी पाला घेऊ नये. तालुक्यातील शेतकऱ्यांचाच भाजीपाला घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले. तालुक्यात बाहेरुन येणाºयांना रोखण्यासाठी १८ ठिकाणी तपासणी नाके उभारले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
बैठकीत व्यापारी संघटनेच्या पदाधिकाºयांनी तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जितेंद्र पाटील, रिझवान शेख, बाबूराव हिवराळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पप्पू पाटील, सुहास पाटील, डॉ.प्रशांत भोंडे, प्रवीण नरवाडे, नानू शाह, शंभू झंवर, दादाराव रोकडे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Jamner decided to keep it closed for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.