नागरिकत्व विधेयकाविरोधात जामनेरला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 05:37 PM2019-12-20T17:37:25+5:302019-12-20T17:39:14+5:30

नागरिकत्व सुधारणा विधेयक रद्द करावे या मागणीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला.

Jamner moves against citizenship bill | नागरिकत्व विधेयकाविरोधात जामनेरला मोर्चा

नागरिकत्व विधेयकाविरोधात जामनेरला मोर्चा

Next
ठळक मुद्देकॉंग्रेस, राष्ट्रवादीकडून मोर्चाद्वारे केला निषेधतहसीलदारांना दिले निवेदन

जामनेर, जि.जळगाव : नागरिकत्व सुधारणा विधेयक रद्द करावे या मागणीसाठी निदर्शन करणाऱ्या जमिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर अत्याचार करणाºया केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी व विधेयक रद्द करावे या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी येथील कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला.
अराफत चौकातून निघालेल्या मोर्चात शहरातील मुस्लीम बांधव निशेध व मागण्यांचे फलक घेऊन मोठ्या संखेने सहभागी झाले होते. तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले. पालिका चौकात व भुसावळ चौफुलीवर मोर्चातील काही तरुणांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.
राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, पप्पू पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत, संदीप हिवराळे, किशोर खोडपे, शंकर राजपूत, माधव चव्हाण, कृष्णा माळी, प्रभू झाल्टे, रफिक मौलाना, प्रल्हाद बोरसे, स्नेहदीप गरूड, डॉ.प्रशांत पाटील, मूलचंद नाईक, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील, अनिस पठाण, अशफाक पटेल, युनूसखान, जहीरखान, मोहन चौधरी, व्ही.पी.पाटील, गणेश झाल्टे, नरेंद्र जंजाळ, मुसा पिंजारी, अजहर शेख आदी उपस्थित होते .
उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Web Title: Jamner moves against citizenship bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.