जामनेर पं.स.सभापतींचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 10:54 PM2018-09-12T22:54:51+5:302018-09-12T22:56:51+5:30
जामनेर : सर्वोच्च न्यायालयाने जात वैधता प्रमाणपत्र सादर करणेची तरतुद बंधनकारक असल्याचे नुकत्याच दिलेल्या निकालामुळे येथील पंचायत समितीच्या सभापती रुपाली पाटील यांना राजीनामा द्यावा लागला. येथील पंचायत समिती सभापती रुपाली पाटील यांनी जात वैधता प्रमाणपत्र न जोडल्याने त्यांची सदस्यता रद्द करावी अशी मागणी शहापुर येथील नागेश पाटील यांनी केली होती. त्या अनुशंगाने जिल्हाधिकारी यांनी येत्या शुक्रवारी १४ रोजी दोघांना आपापली बाजु मांडण्यासाठी बोलाविले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने जात वैधता प्रमाणपत्र सादर करणेची तरतुद बंधनकारक असल्याचे नुकत्याच दिलेल्या निकालात नमुद केले आहे. याचा संदर्भ देत जिल्हाधीकारी यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह बोलविले आहे.
दरम्यान, पंचायत समिती सभापती रुपाली पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर नागेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेत त्याबाबत माहिती दिली.
जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पाटील यांच्या राजीनाम्यानंतर इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु झाली असून राजकीय घडामोंडींना सुरुवात झाली आहे.
सभापती पाटील यांनी दिला राजीनामा
दरम्यान, पं.स.सभापती रुपाली पाटील यांनी बुधवारी दुपारी कार्यालयात पत्रकार परिषदेत आपण जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले. यावेळी नवल पाटील, उपसभापती सुरेश बोरसे, कमलाकर पाटील, विलास पाटील आदी उपस्थीत होते.
न्यायालयाच्या निर्णयानेच राजीनामा
तक्रारदार नागेश पाटील यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, पं.स.सदस्या रुपाली पाटील यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांचेकडे केली होती. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल देखील लागल्याने पाटील यांना राजीनामा द्यावा लागला.