जामनेर पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 03:07 PM2020-04-04T15:07:21+5:302020-04-04T15:08:33+5:30
लॉकडाऊन काळात विनाकारण दुचाकीवर रपेट मारणाऱ्या ३६ वाहनधारकांवर शनिवारी पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.
ठळक मुद्देशनिवारी ३६ वाहनचालकांना आकारला दंडविनाकारण न फिरण्याचे पोलिसांचे आवाहन
जामनेर, जि.जळगाव : लॉकडाऊन काळात विनाकारण दुचाकीवर रपेट मारणाऱ्या ३६ वाहनधारकांवर शनिवारी पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.
जामनेर शहरातील भुसावळ चौफुलीवर शनिवारी सकाळी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, सहाय्यक निरीक्षक धरमसिंंग सुंदरडे व सहकाऱ्यांनी कारवाई केली. यामुळे विनाकारण फिरणाºयांंवर वचक निर्माण झाला आहे.