नंदुरबार येथून 'काल्या'च्या जामनेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 04:10 PM2020-11-05T16:10:50+5:302020-11-05T16:15:48+5:30

नकली नोटा बाजारात आणणाऱ्या शहापूर, ता.जामनेर येथील शेख फारूक शेख नवाब याच्या साथीदारास जामनेर पोलिसांच्या पथकाने नंदुरबार येथून बुधवारी रात्री ताब्यात घेतले.

Jamner police of 'Kalya' from Nandurbar smiled | नंदुरबार येथून 'काल्या'च्या जामनेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

नंदुरबार येथून 'काल्या'च्या जामनेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Next
ठळक मुद्देनकली नोटा प्रकरण फारुकचा होता साथीदार

जामनेर, जि.जळगाव : नकली नोटा बाजारात आणणाऱ्या शहापूर, ता.जामनेर येथील शेख फारूक शेख नवाब याच्या साथीदारास जामनेर पोलिसांच्या पथकाने नंदुरबार येथून बुधवारी रात्री ताब्यात घेतले. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्याच्या मोबदल्यात त्यांना पाचशेच्या नकली नोटा वितरित करणारा फारूक यास एलसीबीच्या पथकाने ३१ ऑक्टोबरला शहापूर येथून अटक केली होती. त्याच्याकडून २६ हजार ५०० च्या नकली नोटा व दुचाकी जप्त करण्यात आली.
फारूक हा नंदुरबार येथील दोघांच्या संपर्कात असून, त्याच्यामार्फत गुजरात येथून नकली नोटा आणतो, अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.
उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेश काळे, जयसिंग राठोड, सचिन पाटील, अमोल घुगे, पांडुरंग पाटील, अमोल वंजारी यांच्या पथकाने मोहसीनखान भिकनखान उर्फ काल्या यास नंदुरबार येथून ताब्यात घेतले.
नोव्हेंबर २०१९ मध्ये फारूक व मोहसीन यांनी आपल्याकडील प्रत्येकी १ लाख २५ हजार असे एकत्रित अडीच लाख देऊन गुजरात येथील एकाकडून १० लाखाच्या नकली नोटा आणल्या होत्या. मिळालेल्या नोटा या हातात पडताच नकली भासत असल्याने मोहसिनने त्या परत केल्या मात्र फारुकीने घेतलेल्या पाच लाखाच्या नकली नोटा खपविल्या, अशी माहिती मिळाली.
फारूक हा कापूस विक्रेता असून तो गावोगावी फिरून शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करीत असे व शेतकऱ्यांना नकली नोटा देत असे.

Web Title: Jamner police of 'Kalya' from Nandurbar smiled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.