जामनेर एस.टी. आगाराचा नफा राज्यात अव्वल
By admin | Published: May 3, 2017 03:02 PM2017-05-03T15:02:43+5:302017-05-03T15:02:43+5:30
मार्च महिनाअखेर जामनेर आगाराला 80 लाखांचा नफा मिळाला आहे.
Next
जामनेर,दि.3- खाजगी प्रवासी वाहतूकीच्या स्पर्धेतही येथील एस. टी. डेपोने आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. मार्च महिनाअखेर जामनेर आगाराला 80 लाखांचा नफा मिळाला आहे. नफ्याच्या बाबतीत जामनेर आगार राज्यात अव्वल असल्याची माहीती आगार व्यवस्थापक के. ए. धनराळे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
भौगोलिक दृष्टय़ा जामनेर तालुका जिल्ह्यात मोठा असून 157 गावे आहेत. त्यातील 4 गावांना चांगले रस्ते नसल्याने त्याठिकाणी एस. टी. पोहचत नाही. अन्य ठिकाणी एस.टी. च्या नियमीत फे:या आहेत. गाव तेथे रस्ता व रस्ता तेथे एस. टी. हे धोरण राबविले जात असल्याने नफा वाढीस हातभार लागला आहे.
लग्नसराईच्या काळात प्रवासी संख्येत होणारी वाढ, जामनेर- बोदवड शटल सेवा, भुसावळ- औरंगाबाद फे:यांमुळे देखील नफा वाढला आहे. गेल्या वर्षी जामनेर आगाराला 67 लाख नफा होता, तो यावर्षी 80 लाख पोहचला आहे.