जामनेर एसटीला अनलॉक भावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:20 AM2021-06-09T04:20:25+5:302021-06-09T04:20:25+5:30
जामनेर : अनलॉकच्या पहिल्या दिवशी येथील एसटीला सुमारे सव्वा लाखाचे उत्पन्न मिळाले. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून उद्यापासून औरंगाबाद, पुणेसोबतच ग्रामीण ...
जामनेर : अनलॉकच्या पहिल्या दिवशी येथील एसटीला सुमारे सव्वा लाखाचे उत्पन्न मिळाले. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून उद्यापासून औरंगाबाद, पुणेसोबतच ग्रामीण भागातील फेऱ्या सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले.
एसटीसोबतच खासगी ट्रॅव्हल्स बससेवा सुरू झाली असून पुणे, सुरतसाठी बुकिंग होत असल्याची माहिती मिळाली. अनलॉकमुळे रात्री ९ पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी असल्याने सायंकाळनंतर खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर खवैय्यांची गर्दी दिसून येत होती. अनलॉक झाले असले तरी बाजारपेठेत अपेक्षित गर्दी दिसून आली नाही. भाजी मंडईत सायंकाळी सहालाच सामसूम झाली. शासकीय व निमशासकीय कार्यालयांना १०० टक्के उपस्थितीचे आदेश असल्याने तहसीलमध्ये शंभर टक्के उपस्थिती होती. पंचायत समितीसह काही ठिकाणी सकाळी ११ पर्यंत पूर्ण हजेरी नसल्याचे दिसून आले.
===Photopath===
070621\07jal_10_07062021_12.jpg
===Caption===
अनलॉकच्या पहिल्या दिवशी जामनेर पंचायत समितीतील शुकशुकाट.