जामनेरला मोकाट डुकरांचा त्रास वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:15 AM2021-07-26T04:15:39+5:302021-07-26T04:15:39+5:30
जामनेर : शहरातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणात डुकरांची संख्या वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्याची नगरपालिकेकडे ...
जामनेर : शहरातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणात डुकरांची संख्या वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्याची नगरपालिकेकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याने, १ ऑगस्टला पालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा भाजपचे नगरसेवक रिझवान शेख यांनी दिला आहे.
धार्मिक स्थळ व कब्रस्तानात डुक्कर घुसत असल्याने, समाजबांधवांच्या धार्मिक भावना दुखावत असून, पालिकेने तातडीने कारवाई कराव,. असे निवेदन शेख यांनी पालिका व पोलिसांना दिले होते. नागरी वसाहत व भाजी मंडईसह व्यापारी पेठेत डुकरांचा वावर वाढल्याने लहान मुले, महिलांना त्रास वाढला आहे.
मुस्लीम प्रभागातून निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांनी याबाबत वेळोवेळी पालिकेला सांगूनही कारवाई होत नाही, याउलट डुक्कर मालकांकडून धमक्या दिल्या जातात, असे शेख यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, मोकाट डुकरांवर कारवाई करणेबाबत पोलीस निरीक्षक यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. मोकाट फिरणाऱ्या डुकरांमुळे धार्मिक स्थळाच्या व्यवस्थापकांच्या भावना दुखावल्या जातात. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी डुक्कर मालकांना नोटीस काढण्याचे पत्रात म्हटले आहे.