जामनेरला मोकाट गुरांसह डुकरांचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 04:51 PM2019-08-07T16:51:06+5:302019-08-07T16:52:14+5:30
जामनेर शहरातील मुख्य रस्त्यावर फिरणारी मोकाट गुरे व डुकरांचा नागरिकांसह वाहन धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
जामनेर, जि.जळगाव : शहरातील मुख्य रस्त्यावर फिरणारी मोकाट गुरे व डुकरांचा नागरिकांसह वाहन धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विविध भागात मोकाट डुकरांची संख्या वाढली असून, त्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पालिका चौक, वाकी रोड, भुसावळ चौफुली या भागात मोकाट गुरे रस्त्यावर ठाण मांडून बसतात. यामुळे वाहनधारकांसह पायी चालणारे नागरिक त्रस्त आहेत.
शहरातील मोकाट डुकरांची संख्या वाढली असून, याबाबत नगरसेवकाने पालिकेला पत्र देऊन कारवाईची मागणी केली होती. मध्यंतरी पालिकेने कारवाईला सुरुवात केली होती. त्यानंतर मोहीम थंडावल्याने डुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. पालिका प्रशासनाने याची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.