Jamner Vidhan Sabha Election Result 2024 Live : भाजपाचे 'संकटमोचक' आघाडीवर; गिरीश महाजन सातव्यांदा विजयी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 10:47 AM2024-11-23T10:47:03+5:302024-11-23T10:47:52+5:30

Jamner Assembly Election 2024 Result Live Updates: भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन विजयी षटकारानंतर यंदा सातव्यांदा जामनेर विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत.

Jamner vidhan sabha assembly election result 2024 winning candidates LIVE BJP Girish Mahajan leading after fifth round of counting | Jamner Vidhan Sabha Election Result 2024 Live : भाजपाचे 'संकटमोचक' आघाडीवर; गिरीश महाजन सातव्यांदा विजयी होणार?

Jamner Vidhan Sabha Election Result 2024 Live : भाजपाचे 'संकटमोचक' आघाडीवर; गिरीश महाजन सातव्यांदा विजयी होणार?

Jamner Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result Live : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा महाफैसला आज होणार आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतरही राज्यातील सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान महायुतीसमोर आहे, तर ही सत्ता आपल्याकडे खेचून घेण्याचे तेवढेच मोठे आव्हान महाविकास आघाडीसमोर आहे. ही निवडणूक आजवरची सर्वात चुरशीची, प्रतिष्ठेची आणि 'सस्पेन्स थ्रीलर' प्रकारात मोडणारी आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन विजयी षटकारानंतर यंदा सातव्यांदा जामनेर विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत. याच दरम्यान जामनेर विधानसभेतून आठव्या फेरीनंतर गिरीश महाजन ९५११ मतांनी आघाडीवर आहेत. गिरीश महाजन यांनी ४२५९४ मतं आणि दिलीप खोडपे यांना ३३०८३ मतं मिळाली आहेत. 

Maharashtra Vidhan Sabha Results 2024

महाजन यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दिलीप खोडपे यांच्याशी आहे. ते पूर्वाश्रमीचे भाजपचे असल्याने महाजन यांच्या स्वकियांशी होत असलेल्या लढतीकडे लक्ष लागले आहे. जामनेरमध्ये महाजन यांच्या प्रचाराची जबाबदारी त्यांच्या अर्धांगिनीसह पदाधिकारी यांनी स्वीकारली होती. महाजन यांनी डोअर टू डोअर प्रचारावर भर दिला. खोडपे यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पक्षाचे नेते शरद पवार, आमदार एकनाथ खडसे यांच्या सभा तर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा रोड शो झाला आहे. 

भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल?, राहुल नार्वेकरांनी स्पष्टचं सांगितलं

कुलाबा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर य़ांनी बाप्पाचं दर्शन घेतलं आणि महायुती १७५ जागा जिंकेल असं म्हटलं आहे. "बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. या राज्यात महायुतीचं सरकार यावं ज्यामुळे या राज्यातील जनतेला न्याय मिळेल आणि राज्य प्रगतीपथाकडे वाटचाल करेल अशी प्रार्थना बाप्पाच्या चरणी केली आहे" असंही सांगितलं. 

भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? असा प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्टचं सांगितलं आहे. आम्ही ही निवडणूक महायुती म्हणून लढत आहोत. युतीमध्ये जे तीन प्रमुख पक्ष आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे की, आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. पण युतीमध्ये जेव्हा निवडणूक लढवली जाते तेव्हा हे सत्य असतं की, संपूर्ण निकाल पाहिल्यानंतर जेव्हा युती जो निर्णय घेईल तो सर्वांनीच स्विकारला पाहिजे. माझ्या मते महायुती १७५ जागा जिंकेल असं म्हटलं आहे.
 

Web Title: Jamner vidhan sabha assembly election result 2024 winning candidates LIVE BJP Girish Mahajan leading after fifth round of counting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.