बंदी असतानाही मतदानावेळी जळगावात ठाण मांडून राहिली जामनेरची मंडळी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:30 PM2019-04-26T12:30:23+5:302019-04-26T12:31:01+5:30

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष

Jamner's church kept burning in Jalgaon during polling ... | बंदी असतानाही मतदानावेळी जळगावात ठाण मांडून राहिली जामनेरची मंडळी...

बंदी असतानाही मतदानावेळी जळगावात ठाण मांडून राहिली जामनेरची मंडळी...

Next

जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडले. मात्र प्रचारासाठी लोकसभा मतदारसंघाबाहेरून आलेल्या मंडळींनी मतदानाच्या दिवशी मतदार संघात न थांबण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश असताना व बारामतीमध्ये राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना याच कारणावरून थांबू दिलेले नसताना जळगावात मात्र जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह जामनेरमधील कार्यकर्त्यांची फौजही मतदान पूर्ण होईपर्यंत जळगावात थांबून होती. प्रशासनाने मात्र त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. दुर्देव म्हणजे शरद पवारांबाबत हा प्रकार घडल्यावरही जळगावात राष्टÑवादीने अशा प्रकारावर आक्षेप घेतला नाही.
जिल्ह्यात आदेश देणेही टाळले
ज्या प्रमाणे बारामती व इतर लोकसभा मतदार संघांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आदेश दिले. आता २९ रोजी मतदान होत असलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघात तेथील निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकाºयांनी लोकसभा मतदार संघात उमेदवारांना प्रचारात मदतीसाठी आलेल्या कार्यकर्ते, प्रतिनिधी, हितचिंतकांनी व जे या मतदार संघात मतदार नाहीत, त्यांनी मतदार संघ सोडून जाण्याचे व मतदान प्रक्रिया संपेपर्यंत लोकसभा मतदार संघात परत न येण्याचे आदेश दिले आहेत. असे व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला आहे. यानुसार कारवाई करणे तर दूरच जळगाव लोकसभा मतदार संघात असे आदेश सुद्धा निवडणूक निर्णय अधिकाºयांनी दिले नाहीत. दिले असल्यास तसे जाहीर प्रसिद्धीस दिले नाहीत. त्यामुळे विरोधकही गाफील राहिले.
कारवाईचा प्रश्नच नाही
निवडणूक निर्णय अधिकाºयांनी बाहेरच्या प्रतिनिधी, कार्यकर्त्यांना मतदानाच्या दिवशी मतदारसंघाच्या बाहेर निघून जाण्याचे आदेश दिलेच नाहीत. त्यामुळे जामनेरहून जळगाव शहरात विशेष मोहीमेवर आलेली सुमारे ४०-५० कार्यकर्त्यांची टीम पद्धतशीरपणे आपले काम करीत होती. जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे देखील जळगावातच ठाण मांडून होते. मात्र त्यांना मतदार संघ सोडून जाण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकाºयांनी न दिल्याने कारवाई करणे तर फार दूरची गोष्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्टÑवादी अनभिज्ञ ?
ज्या दिवशी जळगावात मतदान झाले, त्याच दिवशी बारामती मतदार संघातही मतदान होते. त्या दिवशी राष्टÑवादीचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांना मात्र भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रारी करून बारामती मतदार संघात थांबू दिले नाही. याचा खुलासा पवारांनी दुसºया दिवशी केला असला तरीही पक्षांतर्गत याबाबत काहीच माहिती उमेदवारांपर्यंत पोहोचविण्यात आली नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे राष्टÑवादीचे स्थानिक पदाधिकारी, उमेदवार या नियमाबाबत अनभिज्ञ होते की तक्रार करण्याचे त्यांचे धाडस झाले नाही? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
पैसे वाटप करतानाही पकडला होता कार्यकर्ता
निवडणूक निर्णय अधिकाºयांनी बाहेरच्या मतदारसंघातील लोक मतदार संघात आहेत, याची माहिती मिळाली नव्हती, असे सांगितले असले तरीही जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे दिवसभर शिवतीर्थ मैदानासमोरील त्यांच्या संपर्क कार्यालयातच थांबून होते. विशेष म्हणजे विविध पदाधिकारी, नगरसेवक त्यांना भेटण्यासाठीही तेथे जात होते. तसेच रामेश्वर कॉलनी परिसरात जामनेरच्याच दलाल नामक व्यक्तीस पैसे वाटप करताना पकडण्यात आले होते. पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईही केली आहे.
मतदानाच्या दिवशी जळगाव मतदार संघाबाहेरील राजकीय पदाधिकाºयांना मतदार संघात न थांबण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याचे पालन देखील झाले असून, आमच्याकडे बाहेरील मतदार संघाचे पदाधिकारी थांबले असल्याची कोणतीही तक्रार आली नाही.
-डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी
तथा निवडणूक निर्णय अधिकारी

Web Title: Jamner's church kept burning in Jalgaon during polling ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव