जामनेरचे औषधी वनस्पती संशोधन केंद्र सत्तांतरानंतर दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 02:20 PM2020-11-08T14:20:59+5:302020-11-08T14:22:48+5:30

दुर्मीळ औषधी वनस्पतींवर संशोधन व अध्यापन करणारी नँशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीनल प्लांट या संस्थेच्या उभारणीस दोन वर्षापूर्वी मान्यता दिली होती.

Jamner's Medicinal Plants Research Center neglected after independence | जामनेरचे औषधी वनस्पती संशोधन केंद्र सत्तांतरानंतर दुर्लक्षित

जामनेरचे औषधी वनस्पती संशोधन केंद्र सत्तांतरानंतर दुर्लक्षित

Next
ठळक मुद्देजामनेरचा शापीत औद्योगिक विकासरम प्रकल्प सुरू होऊन पडला बंदस्टॉर्च प्रकल्प सुरु होऊन पडला बंदगाडेगाव सूतगिरणी सुरुवातच नाहीगोडखेळ सहकारी साखर कारखाना सुरवातच नाहीटेक्सटाईल पार्क भवितव्य अधांतरीच

मोहन सारस्वत/लियाकत सैयद
जामनेर, जि.जळगाव : गारखेडे, ता.जामनेर येथे देशभरातील दुर्मीळ औषधी वनस्पतींवर संशोधन व अध्यापन करणारी नँशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीनल प्लांट या संस्थेच्या उभारणीस दिल्ली येथील आयुष मंत्रालयाने दोन वर्षापूर्वी मान्यता दिली होती. यासाठी सुमारे १५ कोटीची तरतूद आयुष मंत्रालयाने केली होती. राज्यातील सत्तांतरानंतर या प्रकल्पाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.
राज्यातील पहिली व देशातील दुसरी संशोधन सस्था असे वर्णन त्यावेळी केले गेले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आयुष मंत्रालयाकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळेच प्रकल्पासाठी जामनेरची निवड केली गेली.
दिल्ली येथील आयुष मंत्रालयाच्या पथकाने ९ जुन २०१८ला इन्स्टिट्यूटच्या उभारणीसाठी गारखेडे परिसरातील सुमारे ५० एकर जमिनीची पाहणी केली होती. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत ५० एकर जागा विनामूल्य देण्यास मंत्रीमंडळाने मंजुरीदेखील दिली होती.
संशोधनास मिळाली असती चालना
या प्रस्तावीत संस्थेत औषधी वनस्पती विषयाशी निगडीत पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमासह संशोधनाची सुविधा उपलब्ध होणार असल्याने त्याचा उपयोग वनस्पतीशास्त्र विषयातील संशोधकांना होईल. खान्देशातील सातपुडा पर्वत क्षेत्रासह अजिंठा लेणी परिसरासह राज्यातील इतर भागात आढळणाऱ्या औषधी वनस्पतींची सखोल शास्त्रीय माहिती या संस्थेत ठेवली जाईल. त्याचबरोबर औषधी वनस्पतींची उपयुक्तता वाढीस लावण्यासाठी येथे संशोधन केले जाईल, असे सांगण्यात आले होते.
प्रकल्पाकडे सकारात्मकतेने पाहावे
राजकीय द्वेषातून पूर्वीच्या शासनकर्त्यांनी आणलेल्या प्रकल्पांना चालना देण्याऐवजी ते प्रलंबित कसे राहतील याकडेच सत्ताधाऱ्यांचे लक्ष असल्याने जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण ठरू पाहणारा हा प्रकल्प अडगळीत पडण्याचीच शक्यता जास्त आहे. वास्तविकत: प्रकल्पाचे काम मार्गी लागल्यास बेरोजगारीची समस्या काही प्रमाणात का होईना कमी होण्यास मदतच होणार आहे. पालकमंत्र्यांनी याकडे सकारात्मक नजरेतून पाहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





 

Web Title: Jamner's Medicinal Plants Research Center neglected after independence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.