जामनेरच्या शिक्षक, विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय प्रकल्पात सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:12 AM2021-06-20T04:12:49+5:302021-06-20T04:12:49+5:30
जामनेर : न्यू इंग्लिश स्कूलमधील शिक्षक, समुपदेशक सुरेश सुरवाडे यांच्यासह पाच भारतीय विद्यार्थ्यांनी इको ट्रेनिंग सेंटर, स्वीडन, प्रादेशिक ...
जामनेर : न्यू इंग्लिश स्कूलमधील शिक्षक, समुपदेशक सुरेश सुरवाडे यांच्यासह पाच भारतीय विद्यार्थ्यांनी इको ट्रेनिंग सेंटर, स्वीडन, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नाशिक आणि बांगला देश एलुमेंटरी एज्युकेशन इन्स्टिट्यूट आयोजित इंडिया-बांगला देश टीचर्स टेलिकोलॅबोरेशन इंटरनॅशनल प्रोजेक्ट २०२१ मध्ये सहभागी होऊन प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केला.
भारत आणि बांगला देश यांच्यातील सांस्कृतिक, भौगोलिक, शैक्षणिक, ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या अनुषंगाने शाश्वत विकासाच्या ध्येयांविषयी सुरेश सुरवाडे, पुणे येथील सुमांता सुरवाडे, सुबोध सुरवाडे, जामनेरचे पूर्वा प्रवीण पाटील, प्रथमेश पाटील व धीरज भालेराव यांनी बांगला देशाच्या तंत्रस्नेही शिक्षिका रुमाना फिरदोस व रीता सरकार यांच्याशी संवाद साधला .
राष्ट्रीय समन्वयक प्रा. योगेश सोनवणे (नाशिक), इंग्लिश टीचर वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक प्रा. भरत शिरसाठ, बांगला देशचे प्रा. सामसुद्दीन तालुकदार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
१६ ऑनलाइन सत्रांचे आयोजन
युनोने २०१५ मध्ये जागतिक पातळीवर शाश्वत विकासासाठी १७ ध्येय निश्चित करून २०३०पर्यंत पूर्णत्वास नेण्याचा संकल्प केला आहे. या १७ ध्येयांपैकी भूक निर्मूलन, दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य, गुणवत्तापूर्ण शिक्षण, लिंग समानता, शुद्ध पाण्याची उपलब्धता, सांडपाण्याची व्यवस्था, असमानता कमी करणे या सात ध्येयांविषयी १६ सत्रांचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले.