जनआंदोलन संघर्ष समितीची उद्या जिल्हा बंदची हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:11 AM2020-12-07T04:11:24+5:302020-12-07T04:11:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शेतकरी आंदोलनाला पाठींबा म्हणून अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीसह ७० संघटनांनी एकत्र येत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शेतकरी आंदोलनाला पाठींबा म्हणून अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीसह ७० संघटनांनी एकत्र येत जिल्हा बंदची हाक दिली असून ८ डिसेंबर रोजी हा बंद पाळला जाणार आहे. अशी माहिती संघटनांच्या प्रतिनिधींनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
दिल्ली येथे ५०० संघटनांच्या एकजुटीतून निर्माण झालेल्या किसान संघर्ष मोर्चाने केंद्र सरकार विरेाधात ८ डिसेंबर रोजी भारत बंदचा नारा दिला आहे. तो जळगाव जिल्ह्यात यशस्वी करण्यात येणार असून त्यासाठी व्यापारी असोसिशन, सर्व मार्केटचे अध्यक्ष, ट्रक व रिक्षा असोसिएशन यांना आवाहन करण्यात आल्याचे या प्रतिनिधींनी सांगितले. जिल्ह्यात बंद पाळून अन्नदात्याच्या सोबत उभे राहावे, असे आवाहन या संघटनांनी केले आहे. यावेळी लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे, सुरेंद्र पाटील, सचिन धांडे, करीम सालार, फारुक कादरी, विष्णू भंगाळे, राम पवार, अमोल कोल्हे, शाईद अली, विजय पवार, दिलीप सपकाळे, रवी देशमुख, भरत कर्डिले, गफ्फार मलिक, नंदू पाटील, शालिग्राम मालकर, शरद चौधरी, जिया बागवान, विजय सुरवाडे, सुजाता ठाकूर, समाधान सोनवणे आदी उपस्थित होते.