जळगावात ‘इस्कॉन’च्यावतीने जन्माष्टमी महोत्सव
By admin | Published: August 21, 2016 12:25 PM2016-08-21T12:25:30+5:302016-08-21T12:25:30+5:30
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनांमृ संघ (इस्कॉन)च्या वतीने जळगावात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दोन दिवसीय ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. २१ : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनांमृ संघ (इस्कॉन)च्या वतीने जळगावात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दोन दिवसीय ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध कार्यक्रम होणार आहे. २५ आॅगस्ट रोजी या महोत्सवाला सुरुवात होईल.
या संदर्भात रविवारी पत्रपरिषद होऊन या महोत्सवाविषयी माहिती देण्यात आली. या वेळी इस्कॉन जळगावचे अध्यक्ष परमात्मा दास, प्रभाकर खानोरे, रमेश महाजन, वासुदेव धनगर, अनिकेत महाजन, पूजा माथूर, मनिषा चौधरी आदी उपस्थित होते.
२५ आॅगस्ट रोजी प्रभात चौकातील शानबाग सभागृहात या उत्सवाला सुरुवात होणार आहे. तसेच २६ रोजी इस्कॉनचे संस्थापकाचार्य श्रीकृष्णकृपा मूर्ती अभयचरणविंद स्वामी श्रील प्रभूपाद यांचा १२०व्या व्यासपूजा महोत्सव सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत साजरा करण्यात येणार आहे. मन्यारखेडा रोडवरील झेड.पी. कॉलनी, गट नं. ४३४ येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन परमात्मा दास यांनी केले आहे.
दोन दिवसीय कार्यक्रम...
- २५ आॅगस्ट : संध्याकाळी साडे सहा वाजता- हरे कृष्ण भक्तवृंदद्वारा संकीर्तन, संध्या. ७.३० वा.- कृष्ण लीला, नृत्य तसेच नाटिका, सांस्कृतिक कार्यक्रम, ८.३० वा.- दीपप्रज्वलन, ९.०० वा.- प्रवचण, १०.०० वा.- अभिषेक, मध्यरात्री १२ वा.- महाआरती, झुलादर्शन, १०८ भोग अर्पण.
- २६ आॅगस्ट : सकाळी १० वा.- वैष्णव भजन आणि कीर्तन, १०.३० वा.- शब्दांजली, ११.३० वा.- पुष्पांजली, दुपारी १२ वाजता- आरती, १०८ भोग, १२.३० वा.- महाप्रसाद.