विमानतळ बातमी जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:16 AM2021-07-26T04:16:23+5:302021-07-26T04:16:23+5:30
१७ जुलै : १५ १८ जुलै : १८ चालू आठवड्यातील संख्या २१ जुलै : २५ २४ जुलै : ३५ ...
१७ जुलै : १५
१८ जुलै : १८
चालू आठवड्यातील संख्या
२१ जुलै : २५
२४ जुलै : ३५
२५ जुलै : ३४
इन्फो :
लसीचे दोन डोस घेतलेल्यांना ‘आरटीपीआर’ची गरज नाही :
परराज्यातून विमानाने महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना पूर्वी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत ठेवणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, आता राज्य शासनाने आरटीपीसीआर चाचणीऐवजी ज्या प्रवाशांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्या प्रवाशांनी विमानतळावर लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखविले, तरी त्यांना महाराष्ट्रात प्रवेशासाठी परवानगी आहे. या निर्णयामुळे अहमदाबादहून जळगावला येणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे, अशी माहिती जळगाव विमानतळाचे संचालक सुनील मुगरीवार यांनी कळविली आहे.
इन्फो :
पावसामुळे बसेसही विलंबाने
पावसामुळे सुरत-अहमदाबाद मार्गावर रेल्वे गाड्या विलंबाने धावत असताना, एसटीच्या महामंडळाच्या बसेसही काहीशा विलंबाने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांची रेल्वेप्रमाणे बसेसही गैरसोय होत असल्यामुळे, अहमदाबादकडे जाणाऱ्या प्रवाशांना विमानसेवाच सध्या सुलभ ठरत आहे. दरम्यान, पाऊस असला, तरी प्रवाशांच्या सोयीसाठी अहमदाबाद-सुरत मार्गावर बससेवा सुरू असल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले.