अमळनेर येथे अक्षय्य तृतीयेपासून यात्रोत्सवास

By admin | Published: April 27, 2017 01:09 PM2017-04-27T13:09:28+5:302017-04-27T13:09:28+5:30

शहराचा धार्मिक, ऐतिहासिक वैभव असलेला हा सोहळा आठवडाभर सुरू राहील

Jatotsav from Akshay Tritiya at Amalner | अमळनेर येथे अक्षय्य तृतीयेपासून यात्रोत्सवास

अमळनेर येथे अक्षय्य तृतीयेपासून यात्रोत्सवास

Next

ऑनलाइन लोकमत

अमळनेर, जि. जळगाव, दि. 27 -  श्री संत सद्गुरू सखाराम महाराज यांच्या यात्रोत्सवाला अक्षय्य तृतीयेच्या दिवशी, 28 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता स्तंभरोपण व ध्वजारोहणाने यात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे.  शहराचा धार्मिक, ऐतिहासिक वैभव असलेला हा सोहळा आठवडाभर सुरू राहील.
28 एप्रिल ते 5 मे दरम्यान तुकाराम महाराज गाथा भजन होईल. त्याचे नेतृत्व हभप एकनाथबुवा वाघ, हभप पंढरीनाथ कागणे, हभप सारंगबुवा करतील.  5 रोजी नऊ रोजी सकाळी 7.30 वाजता मोहन महाराज बेलापुरकर यांचे व दिंडीचे शहरात आगमन होईल. मोहिनी एकादशी, अर्थात 6 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजता रथाची मिरवणूक निघेल.  9 रोजी सखाराम महाराज पुण्यतिथी,  10 रोजी सकाळी सहा वाजता पालखी मिरवणूक सुरू  होईल. तर 11 रोजी सकाळी 10 ते 12 या दरम्यान मोहन महाराज बेलापूरकर यांचे काल्याचे कीर्तन व यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.
 

Web Title: Jatotsav from Akshay Tritiya at Amalner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.