नक्षलवादी हल्ल्यात तारखेडा खु. येथील जवान बालंबाल बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 02:02 PM2020-12-16T14:02:01+5:302020-12-16T14:06:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पाचोरा : नुकताच छत्तीसगड मधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात पाचोरा तालुक्यातील तारखेडा खु. येथील ...
ठळक मुद्देगंभीर जखमी अवस्थेतून उपचार घेतल्यानंतर परतले गावीगावकऱ्यांनी मिरवणूक काढून केला सत्कार
ल कमत न्यूज नेटवर्कपाचोरा : नुकताच छत्तीसगड मधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात पाचोरा तालुक्यातील तारखेडा खु. येथील सुपुत्र कमांडो दीपक अशोक पाटील हे बालंबाल बचावले आहे.गंभीर जखमी अवस्थेतून उपचार घेऊन ते सुट्टीवर गावी परतले आहे. त्यांची मिरवणूक काढून गावकऱ्यांनी सत्कार केला.याबाबत प्राप्त माहिती अशी की, तारखेडा खु. चे रहिवासी दिपक अशोक पाटील हे कोब्रा बटालियन २०६मध्ये कमांडो म्हणून सेवा बजावत आहेत. काही दिवसांपूर्वी छत्तीसगड मधील सुकमा जिल्ह्यातील नक्षलग्रस्त बुरकपाल कॅम्पच्या ६ कि मी अंतरावर रात्री ८च्या सुमारास गस्त घालत असताना नक्षली माओवाद्यांनी आयडी स्फोट घडवून आणला.या स्फोटात कोब्रा बटालियन २०६ चे निरीक्षक नाशिकचे सुपूत्र नितीन भालेराव हे शहीद झाले. याच ठिकाणी दीपक यास पिण्यासाठी पाणी आणण्यास सांगितले असता बाजूला गेलेले दीपक पाटील हे गंभीर जखमी झाले. दैव बलवत्तर असलेले पाटील हे स्फोटात बालंबाल बचावले. त्यांच्यावर उपचार पूर्ण झाल्यानंतर गावी सुट्टीवर आले असता गावकऱ्यांनी व मित्रांनी वाजत गाजत मिरवणूक काढून सत्कार केला.गावकऱ्यांना अभिमान वाटावा, अशी कामगिरी दिपक पाटील बजावत असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.