जवानांनी केले सहकुटूंब श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 07:11 PM2019-04-28T19:11:51+5:302019-04-28T19:11:56+5:30

एकीचे तुफान आलंया: जामद्यात पाणी फाऊंडेशनचा उपक्रम

Jawan Kirtan Shubdan | जवानांनी केले सहकुटूंब श्रमदान

जवानांनी केले सहकुटूंब श्रमदान

Next


चाळीसगाव: पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या जामदा गावात रविवारी जवानांनी सहकुटुंब श्रमदान करुन दुष्काळाविरुद्धची लढाई आम्ही जिंकणारच, असा मंत्र जागविला. यामुळे गावात रणरणत्या उन्हातही वेगळा उत्साह संचारला आहे.
रविवारी जामदा गावातील २० सैनिकांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन सहकुटुंब श्रमदान केले. याबरोबरच उपक्रमात खारीचा वाटा म्हणून त्यांनी २१ हजाराची देणगीही दिली.
देशाच्या सीमांवर शत्रुंशी दोन हात करणाऱ्या सैनिकांनी 'जय जवान...जय किसान' हा नाराच एकप्रकारे खरा करुन दाखविला. शेतकऱ्यांनी माणूस जगविण्याचे काम करावे. आम्ही शत्रुला इंचभरही पुढे सरकू देणार नाही, अशी भावना या स्पधेर्मुळे जागृत झाल्याची प्रतिक्रिया सैनिकांनी यावेळी व्यक्त केली. आम्ही देखील गावाला पाणीदार करण्यासाठी कंबर कसली असल्याचेही ते म्हणाले.
गावचे भुमीपुत्र व उद्योजक ठाणसिंग पाटील यांनी देखील श्रमदान करून गावाला १५ हजार रुपयांची देणगी दिली. त्यांनी गावकºयांना या कामासाठी एकत्र येऊन श्रमदान करा असे आवाहनही केले. पाणी फाउंडेशन टिमच्या वतीने सर्व सैनिकांचा आणि कुटूंबियांचा टोपी - रूमाल देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आनंदसिंग राजपूत, अशोक अहिरे, बापू काकडे, रविंद्र सोनवणे, सुनिल पाटील, संतोष अहिरे, दीपक महाले, महेश मांडोळे, शिवाजी कोळी, रविंद्र माळी, गोपाल पाटील, अनिल पाचपुते, मुन्ना खाटिक, प्रकाश गोकुळ, अविनाश जाधव, हर्षल अहिरे, रमेश सावंत, विनोद अहिरे, रविंद्र माळी, श्रीकांत नवले आदी जवान उपस्थित होते. तालुक्याचे समन्वयक विजय कोळी, निलेश पगारे यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Jawan Kirtan Shubdan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.