Jayant Patil: जयंत पाटील यांनी घेतली मराठा आंदोलकांची भेट
By आकाश नेवे | Published: October 14, 2022 05:24 PM2022-10-14T17:24:39+5:302022-10-14T17:26:09+5:30
Jayant Patil: निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याला अटक करावी,आणि बडतर्फ करावे,या मागणीसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू आहे. त्याठिकाणी जयंत पाटील यांनी भेट दिली.
- आकाश नेवे
जळगाव : सकल मराठा समाज साखळी उपोषण आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट दिली. निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याला अटक करावी,आणि बडतर्फ करावे,या मागणीसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू आहे. त्याठिकाणी जयंत पाटील यांनी भेट दिली. आणि साखळी उपोषण आंदोलनाला पाठिंबा दिला.
यावेळी जळगाव शहर व जिल्ह्यातील इतर तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. बकालेला अजूनही अटक करण्यात आलेली नाही. त्यासाठी प्रशासनाविरोधात विविध समाज आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे. जयंत पाटील यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील,जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर,माजी मंत्री डॉ. सतीश पाटील,महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी,मंगला पाटील,राम पवार, विनोद देशमुख आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार
बकालेला अटक होण्यासाठी व सेवेतून कायम बडतर्फ करण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. लवकरात लवकर अटक किवा बडतर्फ न केल्यास मोठ्या संख्येने मराठा समाज आत्मदहन करणार व जळगाव जिल्हा स्तरावरील मोठ्या मोर्चाचे आयोजन लवकरच करेल,असा इशारा देण्यात आला आहे.