‘बुध्दिबळ’च्या निवड चाचणीत जयेश व ऋतुजा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2023 03:51 PM2023-04-01T15:51:36+5:302023-04-01T15:54:14+5:30

मुलींच्या वयोगटात पाचोर्‍याची ऋतुजा बालपांडे हीने तीन गुण घेत प्रथम क्रमांक पटकावला.

Jayesh Sapkale and Rituja Balpande won the chess selection test competition in Jalgaon | ‘बुध्दिबळ’च्या निवड चाचणीत जयेश व ऋतुजा अव्वल

‘बुध्दिबळ’च्या निवड चाचणीत जयेश व ऋतुजा अव्वल

googlenewsNext

कुंदन पाटील

जळगांव: जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित १७ वर्षे वयोगटातील बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जळगावच्या जयेश सपकाळे व पाचोर्‍याची ऋतुजा बालपांडे यांनी बाजी मारली.

स्पर्धेत जयेशने साडेपाच गुण घेत सरस टायब्रेकच्या आधारे व पाचोरा येथील वैभव पाटील याने साडेपाच गुण घेत दुसरा तर तिसरा क्रमांक श्रेयस उपासनी पाच गुण घेत पटकावला.

मुलींच्या वयोगटात पाचोर्‍याची ऋतुजा बालपांडे हीने तीन गुण घेत प्रथम क्रमांक पटकावला. तेरा वर्षे वयोगटात उत्तेजनार्थ बक्षीस युग कोटेचा (भुसावळ), आर्य कुमार शेवाळकर (पाचोरा), दुर्वेश कोळी (जळगाव), सोहम चौधरी, दर्शन पाटील (भुसावळ) यांना देण्यात आले.अकरा वर्षे वयोगटात हिमांशू सरोदे (भुसावळ) प्रथम, नक्ष झवर (जळगाव) द्वितीय  तर चरण नाईक (पाचोरा) हा तृतीय आला. नऊ वर्ष गटात रोनित बालपांडे (पाचोरा), रुजूल सरोदे (भुसावळ) तर सात वर्षे वयोगटात समर्थ पोळ (जळगाव) हा विजेता ठरला.

सचिव नंदलाल गादिया, राष्ट्रीय खेळाडू चंद्रशेखर देशमुख, नथू सोमवंशी यांच्याहस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. निवड झालेले खेळाडू दि. १४ ते १६ एप्रिलदरम्यान बुलडाणा येथे होणाऱ्या  राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होतील. स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे,नथू सोमवंशी, परेश देशपांडे,सोमदत्त तिवारी यांनी काम पाहिले.
 

Web Title: Jayesh Sapkale and Rituja Balpande won the chess selection test competition in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.