टेकवाडे फाट्यावर जीप कालव्यात उलटली, ३ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 03:28 PM2020-11-26T15:28:39+5:302020-11-26T15:29:04+5:30
जीपचालकाचा ताबा सुटल्याने उजव्या कालव्यात उलटली.
भडगाव : तालुक्यातील वाडे येथून जवळच असलेल्या टेकवाडे-बहाळ फाट्यावरील वळण रस्त्यावर जीपचालकाचा ताबा सुटल्याने जीपजामदा उजव्या कालव्यात उलटली. त्यात चालकासह तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी सकाळी घडली.
नावरे येथील पांडुरंग सोनवणे यांच्या मालकीची जीप गाडी (क्रमांक एचएच-१२-एम व्ही-६०१२) ही नावरे गावाहून सकाळी आठला चाळीसगाव येथे मक्याचे भुणके कणीस घेऊन जात होती. तेव्हा टेकवाडे बहाळ फाट्यावरील वळण रस्त्यावर चालकाचा स्टेरिंगवरील ताबा अचानक सुटला आणि जीप रस्त्यावरून थेट १५ फूट खोल असलेल्या जामदा कालव्यात उलटली. या अपघातात चालकासह तीनजण किरकोळ जखमी झाले आहेत.
दैवयोगाने ते या विचित्र अपघातात ते बालबाल बचावले. यावेळी ऋषीपांथा येथे रस्ता दुरुस्तीचे काम सुरू होते. तेथे हा आवाज गेल्याने बहाळ, टेकवाडे येथील ग्रामस्थांनी अपघात स्थळी धाव घेत मदत करून या जखमींंना बाहेर काढले. यानंतर बहाळ येथील पत्रकार दीपक परदेशी यांनी त्यांच्या जेसीबीच्या साह्याने गाडी कालव्यातून बाहेर काढून मदत केली.