जपानमध्ये नेली जळगावातून जिलेबीची रेसीपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:16 PM2017-11-30T12:16:48+5:302017-11-30T12:23:36+5:30
टोकीयोची टिम : खवैय्या महिलांनी घेतला अस्वादही
Next
ठळक मुद्देविशेष काहीतरी मिळाले.. जपान मध्येही या पदार्थाचा आस्वाद घेता येणार
ज गाव- देशातील विविध भागातील पदार्थाचे वेगवेगळे वैशिष्टय़ आहे. प्रत्येक राज्यातील पदार्थाची देवाघावण झाल्याने भारताची खाद्यासंस्कृती समृद्ध झाली आहे. यात ग्रामीण भागापासून ते शहरार्पयत सर्वार्पयत सहज पोहलेल्या जिलेबीने जपानच्या खवय्यांनाही आपलेसे करुन टाकले. नुकतीच एक जपानी टिमने मनसोक्त आस्वाद घेत जिलेबीची रेसीपी जळगावातून नेली आहे. याबाबत माहिती अशी की, जळगावातील मूळचे रहिवासी डॉ. अभिषेक जैस्वाल हे अनेक वर्षामध्ये जपानची राजधानी टोकियो येथे स्थायिक झाले आहे. नुकतेच ते जळगाव येथील त्यांचे नातेवाईक नितीन लालापुरे यांच्यकडे येवनू गेले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आरती जैस्वाल तसेच जपानमधील नुरोसान, नोबुको, सुमीको, युमीकोसान, त्सुमो आदी जपानी महिला व काही पुरुषांची टीमही भारत काही दर्शनासाठी आली होती. .यादरम्यान लालापूरे यांनी या सर्वाना जळगावातील ब्रिजविलास स्वीट मार्ट येथे जिलेबीचा, रबडी, पापडी आदी पदर्थाचा आस्वाद देण्यासाठी आणले. हे सर्व पदार्थ खपूच आवडय़ाने त्यांनी संचालक सतीश अग्रवाल यांच्याकडून साधी जिलेबी, मावा, जिलेबी आणि रबडी व पापडीचीही रेसीपी समजून घेत लिहूनही घेतली. यामुळे जपान मध्येही या पदार्थाचा आस्वाद या मंडळींना घेता येणार आहे. विशेष काहीतरी मिळाले..जिलेबी व इतर पदार्थाचा अस्वाद घेतल्यावर जपानी टिममधील महिलांना खूपच आनंद झाला. यामुळे आपल्या भारत दौ:यात या रेसीपीच्या माध्यमातून विशेष काही तरी मिळाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.