जळगावला येत असताना बसमधून नातीच्या लग्नाचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:59 PM2017-12-23T12:59:07+5:302017-12-23T13:02:17+5:30
गुन्हा दाखल
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 23- धरणगाव तालुक्यातील अनोरे येथून जळगावी येत असताना बसमधून नातीच्या लग्नासाठी खरेदी केलेली मंगलपोत, कानातले टोंगल यासह बॅगमधील दीड लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली आह़े याप्रकरणी रात्री 10़30 वाजेच्या सुमारास तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला़ डीवायएसपी सचिन सांगळे यांनी पोलीस ठाण्यात भेट देत माहिती जाणून घेतली़
सेवानिवृत्त बँक कर्मचारी भास्करराव कापडणे हे पत्नी कल्पना कापडणे हिच्यासह अनोरे येथे वास्तव्यास आहेत़ कल्पना यांच्या पुतणीच्या मुलीचे नवसारी येथे लग्न असल्याने तेथे जाण्यासाठी त्यांनी जळगाव येथून ट्रॅव्हल्सचे तिकिट बुक केले होत़े कल्पना यांची खोटेनगरात अवनी निलेश बि:हाडे ही बहिणी आह़े शुक्रवारी अनोरे येथून बसने शहरात आल़े दुपारी 12़30 वाजता दोघे खोटेनगर थांबा येथे उरतल़े तेथून बहिणी अवनी बि-हाडे यांच्याकडे गेल़े याठिकाणी जेवण झाल्यावर बहिणीला नातीसाठी घेतलेले दागिने दाखविण्यासाठी बॅग उघडली असता त्यात साडेतीन तोळ्याची मंगलपोत, पाच ग्रॅमची अंगठी अडीच ग्रॅमचे कानातले व 9500 रुपये रोख असा ऐवज गायब असल्याचे दिसून आल़े चोरी झाल्याची खात्री झाल्यावर त्यांनी नातेवाईक असलेल्या मंगला बारी यांना घटना कळविली व त्यांच्यासह तालुका पोलीस ठाणे गाठल़े