जळगावातील घरफोडीत चोरटय़ांनी लांबविले दागिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2017 04:05 PM2017-05-02T16:05:29+5:302017-05-02T16:05:29+5:30
कुटुंब घरात झोपलेले असताना केली घरफोडी. रोख रक्कम, सोने-चांदीच्या दागिन्यासह 50 हजाराचा ऐवज केला लंपास
Next
जळगाव,दि.2- संपुर्ण कुटूंब घरात झोपले असताना चोरटय़ांनी पिंप्राळा परिसरातील सेंट्रल बॅँक कॉलनीत शौचालयावर चढून रावसाहेब जयराम खोंडे यांच्या दुस:या मजल्यावरील घरातून सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 50 हजाराचा ऐवज लांबविल्याची घटना मंगळवारी पहाटे 3 ते 4.30 वाजेच्या सुमारास घडली.
रावसाहेब खोंडे हे रात्री गच्चीवर झोपण्यासाठी गेले होते.रात्रीे लघुशंका करण्यासाठी दरवाजाची कडी उघडून गॅलरीतील शौचालयात गेले. घरात येताना दरवाजाची कडी लावल्याचे ते विसरून गेले. त्याचाच फायदा चोरटय़ांनी घेतला. खालच्या शौचालयाच्या छतावर चढून वरच्या गॅलरीत प्रवेश केला. दोन्ही खोल्यांमध्ये कुटुंब झोपले असताना पंधरा मिनीटात त्यांनी रावसाहेब खोंडे यांनी टांगलेल्या पॅँटच्या खिशातील आठ हजाराची रोकड, कविता खोंडे यांचे पाकीट, जाऊ सोनाली अहिरराव यांची ठेवलेल्या रोकड, दागिण्यांची पर्स सोबत घेतली. किचन रूममध्ये महिलांनी उशीजवळ ठेवलेले तीन मोबाईल उचलून चोरटय़ांनी पोबारा केला.