जिनिंगची धडधड मंदावली..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2017 12:29 AM2017-01-07T00:29:37+5:302017-01-07T00:29:37+5:30
नोटाबंदीचा परिणाम : चांगले भाव असून बोदवड येथील कापसाच्या बाजारपेठेवर परिणाम
बोदवड कापसाची बाजारपेठ असलेल्या बोदवड तालुक्यातील 11 जिनिंगची धडधड कापसाअभावी मंदावली आहे. नोटाबंदीचा परिणाम या कापसाच्या बाजारपेठेवर झाला आहे.
केंद्र सरकारने पाचशे व हजाराच्या नोटांवर बंदी घातली. त्यानंतर जिनिंग उद्योजकांनी कापूस खरेदी चार हजार 600 ते चार हजार 800 रुपयांर्पयत चेक व टोकनने देण्यास सुरू करीत व्यवहार काही अंशी सुरू केला त्यात काही शेतक:यांनी कापूस विकून चेक ही घेतले, परंतु बँकांसमोर लागलेल्या रांगा तर आठवडय़ाला मिळणारी दोन हजार-चार हजार र्पयतच्या रकमेने शेतक:यांनी कापसासह शेतमाल विकणे बंद केले आहे.
दुसरीकडे बोदवड तालुक्यात जेमतेम चार राष्ट्रीयकृत बँका आहेत. पूर्ण भार त्यावर पडल्याने रोख रकमेची अडचण सुरू आहे.
जिनिंग उद्योजकाचे हात ही बांधल्या गेल्याने हातात घास असून ही जेऊ शकत नसल्याची परिस्थिती शेतकरी व उद्योजकांवर ओढावली आहे. कापसाच्या बाजारपेठेवर नोटबंदीचा परिणाम झाला आहे.
या आठवडय़ात राज्य पणन महासंघ व सीसीआयचे केंद्रीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले आहे. त्यांनी खुल्या लिलाव पद्धतीने कापसाच्या खरेदीला सुरुवात केली आहे. त्यामुळे उद्योजक ही कापसाला वाढीव भाव देण्यास तयार झाला आहे. त्यामुळे केंद्राच्या कापूस खरेदी केंद्रावरील पाच हजार 100 च्या खरेदीला राज्य पणन महासंघाने पाच हजार 400 तर जिनिंग उद्योजकांनी पाच हजार 500 र्पयतच्या भावात कापसाच्या खरेदीला सुरुवात केली आहे. पण नोटाबंदीच्या कारणामुळे बॅँकांसमोरील रांगा व मिळणारी पूर्ण सोन्याची किंमत आज मातीमोल झाली आहे. शेतकरी कापूस विकण्यास कचरत आहे. परिणामी जिनिंगची धडधड मंदावली आहे.
जागतिक बाजारपेठेत
कापसाला मागणी
बांगलादेश, पाकिस्तान, इंडोनेशिया, जाकार्ता या देशात कापसाला मोठी मागणी आहे तर चीनने मागणी कमी केली आहे. कापसाच्या एका गठाणीचा भाव 40 हजार रुपयांर्पयत आहे. बांगलादेशसह इंडोनेशियामध्ये भारतीय कापसाला मागणी असल्याची माहिती दिली.
गठाणी 40 हजार, सरकी दोन हजार 400 ते 500 व कापूस भावच हजारावर गेला आहे.