चाळीसगावला येणार ज्ञानप्रकाश यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 08:56 PM2019-11-16T20:56:04+5:302019-11-16T20:59:13+5:30

लोणावळा स्थित मनशक्ती केंद्रातर्फे दरवर्षी स्वामी विद्यानानंद यांच्या कृतज्ञता स्मरण दिनानिमित्त ज्ञानप्रकाश यात्रेचे आयोजन केले जाते. यावर्षी ही यात्रा चाळीसगाव येथे १९ ते २२ दरम्यान येत असून चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Jnana Prakash Yatra will be coming to Chalisgaon | चाळीसगावला येणार ज्ञानप्रकाश यात्रा

चाळीसगावला येणार ज्ञानप्रकाश यात्रा

Next
ठळक मुद्देमनशक्ती केंद्राचे आयोजन१९ ते २१ असे चार दिवस कार्यक्रमराज्यातील ३५ साधक करणार मार्गदर्शनसकाळ आणि सायंकाळ दोन सत्रात प्रबोधन१५ नागरिक व विद्यार्थ्यांपर्यत पोहचवणार ज्ञानप्रकाशपत्रपरिषदेत दिली माहिती

चाळीसगाव, जि.जळगाव : लोणावळा स्थित मनशक्ती केंद्रातर्फे दरवर्षी स्वामी विद्यानानंद यांच्या कृतज्ञता स्मरण दिनानिमित्त ज्ञानप्रकाश यात्रेचे आयोजन केले जाते. यावर्षी ही यात्रा चाळीसगाव येथे १९ ते २२ दरम्यान येत असून चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मार्गदर्शन करण्यासाठी आठ महिला आणि २७ पुरुष साधक उपस्थित राहणार आहे. तालुक्यातील १५ हजार नागरिक, विद्यार्थ्यांपर्यंत यात्रेचा ज्ञानप्रकाश पोहचविण्याचा संकल्प येथील साधकांनी शनिवारी दुपारी घेतलेल्या पत्रपरिषदेत व्यक्त केला.
चाळीसगाव परिसरातील ३५ साधकांनी गेली दोन महिने तालुकाभरातील शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये आणि नागरिकांशी जनजागृतीपर संवाद साधला. यासाठी २२० बैठका घेऊन ज्ञानप्रकाश यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यात्रेचे हे २६ वे वर्ष असून चाळीसगाव येथे दुसऱ्यांदा यात्रेचे आयोजन होत आहे.
भडगाव रोडस्थित लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात १९ पासून यात्रेला सुरुवात होईल. दरदिवशी सकाळी साडे नऊ ते साडे दहा आणि सायंकाळी साडे सहा ते रात्री आठ पर्यंत कौटुंबिक सौख्य, ध्यान एक अनुभव, वास्तूशुद्धी कशी कराल?, अभ्यास यशाच्या युक्त्या (स्ट्रॉबोस्कोप टेस्टसहा), ताणमुक्त जीवन, युवाक्रांती, सुजाण पालकत्व आदी विषयांवर राज्यभरातून आलेले अनुभवी साधक प्रबोधन करतील. काही विवेचनांमध्ये प्रात्यक्षिक व चाचणी देखील घेण्यात येणार आहे. प्रवेश विनामुल्य आहे.
पत्रपरिषदेला शंतनू पटवे, प्रकाश वाबळे, डॉ. नीलेश देशपांडे, हेमंत कुलकर्णी, राजेश येवले, विनायक देशपांडे उपस्थित होते.

Web Title: Jnana Prakash Yatra will be coming to Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.