जळगाव दूध संघात संचालकांच्या नातेवाइकांना नोकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2017 12:06 PM2017-04-14T12:06:42+5:302017-04-14T12:06:42+5:30
जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामध्ये संचालकांच्या जवळच्या नातेवाइकांना ठेका पद्धतीवर नोक:या मिळाल्या आहेत.
Next
जळगाव,दि.14- जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामध्ये संचालकांच्या जवळच्या नातेवाइकांना ठेका पद्धतीवर नोक:या मिळाल्या आहेत. दरमहा 15 हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा उल्लेख नियुक्त्या करताना केला आहे. यातच काही संचालकांच्या नातेवाइकांना मोठे वेतनही काही महिन्यांमध्येच मिळू लागले आहे. संघात या संचालकांच्या नातेवाईक कर्मचा:यांना फारसे कामही नसल्याची तक्रार आहे.
संचालिका श्यामल झांबरे यांची बहिण, दूध संघातून निवृत्त झालेले पशुवैद्यकीय अधिकारी चंद्रकांत मोतीराम पाटील, एका कामगार संघटनेच्या अध्यक्षाचा पुत्र व इतर काही संचालकांच्या नातेवाइकांना दरमहा मोठी रक्कम देऊन संघाची फसवणूक करण्याचा प्रकार दूध संघामध्ये सुरू असल्याची तक्रार संघातील माजी सुरक्षा अधिकारी एन.जे.पाटील यांनी केली आहे.
चोरीच्या प्रकरणांचा तपास नाही
9 जानेवारी 2013 रोजी दुग्धजन्य पदार्थाची चोरी दूध संघात झाली, 28 जुलै 2014 रोजी 96 किलो तुपाची चोरी झाली. 16 सप्टेंबर 2014 रोजी पुन्हा दूध चोरीचा प्रकार संघात झाला. 12 डिसेंबर 2014 रोजी एक हजार लीटर पेक्षा अधिक दुधाची चोरी संघात झाली. या प्रकरणांत रोजंदारी कर्मचा:यांविरूद्ध गुन्हा दाखल झाला.या प्रकरणांचा तपास झालेला नाही, असेही एन.जे.पाटील यांनी म्हटले आहे. अलीकडेच कर्मचारी, अधिकारी यांनी मिळून दूध संघात दूध संकलानाचे आकडे फुगवून मोठा अपहार केला. पण अशांचा बचाव करण्याचा प्रयत्न संचालक मंडळ करीत आहे, अशी तक्रार एन.जे.पाटील यांनी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे नुकतीच केली आहे. त्यात राज्यमंत्री पाटील यांनी या प्रकरणात नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन आपल्याला दिल्याची माहिती एन.जे.पाटील यांनी दिली.