उत्तरपत्रिका तपासणीचे काम निवृत्त शिक्षकाकडे
By admin | Published: March 11, 2017 12:40 AM2017-03-11T00:40:54+5:302017-03-11T00:40:54+5:30
दहावी परीक्षेनंतरचा प्रकार उघड
Next
नंदुरबार : दिवसाला केवळ एकच उत्तरपत्रिका तपासणीच्या आंदोलनामुळे बारावीच्या निकालाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तर तळोद्यातील सेवानिवृत्त शिक्षकास दहावीचे पेपर तपासणीचे काम देण्याचाही प्रकार उघड झाला आहे.
तळोदा तालुक्यातील दोन वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकासही दहावीचे पेपर तपासणीचे काम बोर्डाने दिले आहे. त्यामुळे बोर्डाचा कारभारही चव्हाटय़ावर आला आहे.
बारावीचे काय?
कनिष्ठ प्राध्यापकांनी मागण्यांसाठी दिवसाला केवळ एकच पेपर तपासणीचे आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे दहा दिवसानंतरही पेपर तपासणीचे पूर्ण झाले नाही. परिणामी निकालाचा मुहूर्त अडचणीत सापडला आहे.